महिलेला एक तास कमी करायचे होते काम, कंपनीने नकार दिला; आता मिळणार 2 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 12:33 PM2021-09-09T12:33:35+5:302021-09-09T12:34:58+5:30

Woman wins £180,000 after boss wouldn’t let her leave early : या महिलेला आठवड्यातून चार दिवस काम करायचे होते आणि मुलाची काळजी घेण्यासाठी संध्याकाळी 6 ऐवजी संध्याकाळी 5 वाजता तिला ऑफिसमधून सुट्टी घ्यायची होती.

woman wins sex discrimination payout 1 crore 87 lakh rs after company boss would not let her leave early | महिलेला एक तास कमी करायचे होते काम, कंपनीने नकार दिला; आता मिळणार 2 कोटी

महिलेला एक तास कमी करायचे होते काम, कंपनीने नकार दिला; आता मिळणार 2 कोटी

googlenewsNext

लंडनमध्ये एका महिलेने  (London Woman) आपल्या लहान मुलीची काळजी घेण्यासाठी कंपनीकडून नोकरीदरम्यान(Job) काही सवलती मागितल्या. मात्र, कंपनी आपले नियम बदलू शकत नाही, असे सांगून नकार दिला. अशा परिस्थितीत आपल्या मुलीला सांभाळण्यासाठी या महिलेला नोकरी सोडावी लागली. पण तिने हे प्रकरण एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनलकडे (Employment Tribunal)नेले. त्यामुळे तिला 1 कोटी 87 लाख रुपयांपेक्षा जास्त 'नुकसान भरपाई' मिळाली. (Woman wins £180,000 after boss wouldn’t let her leave early to pick up daughter)

दरम्यान, अॅलिस थॉम्पसन (Alice Thompson)नावची महिलालंडनच्या एका कंपनीत सेल्स मॅनेजर होती. ती आपले काम चांगल्या प्रकारे करत होती. पण 2018 मध्ये, जेव्हा ती गर्भवती झाली आणि मुलीला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी नोकरीवर परतली, तेव्हा तिला खूप त्रास झाला. अॅलिसने आपला बॉस पॉल सेलर यांना तिच्या लहान मुलीची काळजी घेण्यासाठी काही सवलती मागितल्या. तिला आठवड्यातून चार दिवस काम करायचे होते आणि मुलाची काळजी घेण्यासाठी संध्याकाळी 6 ऐवजी संध्याकाळी 5 वाजता तिला ऑफिसमधून सुट्टी घ्यायची होती. कारण अॅलिस आपल्या मुलीला नर्सरीमध्ये (केअरटेकरजवळ) सोडून नोकरीला येत असे.

नर्सरी संध्याकाळी 5 वाजता बंद व्हायची, म्हणून तिला संध्याकाळी 5 च्या आधी मुलीला नर्सरीमधून घरी आणावे लागत होते. ऑफिसची सुट्टी संध्याकाळी 6 वाजता होत होती. त्यामुळे अॅलिसने आपल्या बॉसला विनंती केली की, तिला ऑफिसमधून एक तास आधी सोडा. मात्र बॉसने एक तास आधी सुट्टी देण्यास नकार दिला. बॉस पॉल सेलर यांनी तिची विनंती नाकारली आणि बिझनेस तिच्यासाठी जोखीम घेऊ शकत नाही, असे सांगितले.

यानंतर महिलेने कंपनीचा राजीनामा दिला. दरम्यान, अॅलिस थॉम्पसन फक्त राजीनाम्यावरच थांबली नाही, तर तिने हे प्रकरण लंडनमधील एम्प्लॉयमेंट ट्रिब्यूनलकडे नेले. यावेळी मुलगी मोठी झाल्यावर मला जसा अनुभव आला तसाच मुलीला येऊ नये, असा विचार अॅलिसने केला.  ट्रिब्यूनलमधील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजू ऐकल्या गेल्या आणि त्या महिलेला नुकसानभरपाई म्हणून 1 कोटी 87 लाख रुपयांहून अधिक रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सुनावणीत सांगण्यात आले की, अॅलिस एका छोट्या फर्मसाठी काम करू लागली. ऑक्टोबर 2016 मध्ये सुरू झालेल्या या नोकरीतून त्यांनी वर्षाला 1 कोटी 21 लाख कमावले. परंतु 2018 मध्ये जेव्हा ती गर्भवती झाली तेव्हा तिचे कंपनीशी संबंध बिघडले. कंपनीने अधिक लवचिक कामकाजाचा विचार न केल्याने अॅलिस थॉम्पसनचे मोठे नुकसान झाले, असे ट्रिब्यूनलला आढळून आले. उत्पन्नाचे नुकसान, पेन्शनचे नुकसान, भावना दुखावल्या, लिंगभेद केल्याबद्दल 1 कोटी 87 लाखांपेक्षा जास्त नुकसानभरपाई देण्याचा निर्णय न्यायाधीशांनी दिला.

Web Title: woman wins sex discrimination payout 1 crore 87 lakh rs after company boss would not let her leave early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.