जगातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी कोणती? भारताच्या IndiGo चा कितवा क्रमांक? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:56 IST2025-12-09T18:55:56+5:302025-12-09T18:56:48+5:30
Worlds Biggest Airlines: इंडिगो एअरलाइन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे.

जगातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी कोणती? भारताच्या IndiGo चा कितवा क्रमांक? जाणून घ्या...
Worlds Biggest Airlines: गेल्या काही दिवसांपासून Indigo एअरलाइन खूप चर्चेत आली आहे. इंडिगोच्या शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे, देशभरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. विमानतळाची अवस्था रेल्वे स्टेशनसारखी झाल्याचे पाहायला मिळतेय. अशा परिस्थितीत एक प्रश्न अनेक प्रवाशांच्या मनात आला असेल की, भारतात सर्वात मोठी एअरलाइन म्हटले तर इंडिगोचे नाव घेतलं जाते, पण जागतिक स्तरावर कोणती एअरलाइन सर्वात मोठी आहे?
जगातील नंबर-1 एअरलाइन
विमानांची संख्या, म्हणजेच फ्लीट साइज लक्षात घेतल्यास, जगातील सर्वात मोठी एअरलाइन अमेरिकेची युनायटेड एअरलाईन्स आहे. विमानांची संख्या अंदाजे 1,050-1,055 असून, ताफ्यात बोईंग आणि एअरबस आहेत. याशिवाय, लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी 737 MAX आणि 787 ड्रीमलाइनर सारखी अत्याधुनिक विमाने आहेत. म्हणजेच जगात सर्वाधिक विमाने याच कंपनीची आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकन एअरलाईन्स
युनायटेडच्या पाठोपाठ अमेरिकन एअरलाईन्स आहे, ज्यांचा ताफा 1002 विमानांपर्यंत पोहोचला आहे. फ्लीट साइजमध्ये ही दुसऱ्या क्रमांकावर असली, तरी दररोजच्या उड्डाणांमध्ये आणि प्रवासीसंख्येच्या बाबतीत अमेरिकन एअरलाईन्सला ‘जगातील सर्वात मोठी एअरलाइन’ मानली जाते. 1926 मध्ये सुरू झालेली ही कंपनी जवळपास संपूर्ण शतकभर उड्डाण क्षेत्रात अग्रस्थानी आहे.
टॉप-10मध्ये भारताची इंडिगो 8व्या क्रमांकावर
फ्लीट साइजच्या आधारावर जागतिक दिग्गजांच्या तुलनेत भारताची इंडिगो जगातील 8वी सर्वात मोठी एअरलाइन आहे. इंडिगोकडे 417 विमाने असून, हा आकडा भारताच्या विमानवाहतुकीची वाढती ताकद दर्शवतो.
जगातील टॉप एअरलाईन्स (फ्लीट साइजच्या आधारे)