अमेरिकन नागरिक असलेल्या १४ वर्षीय मुलांसाठी कोणत्या प्रकारचा पासपोर्ट गरजेचा असतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 04:18 PM2020-07-11T16:18:44+5:302020-07-11T16:24:30+5:30

अमेरिकन नागरिक असलेल्या लहान मुलांच्या पासपोर्टसाठी असणारे नियम जाणून घेणं गरजेचं आहे.

What kind of passport is required for a 14 year old girl who is a US citizen | अमेरिकन नागरिक असलेल्या १४ वर्षीय मुलांसाठी कोणत्या प्रकारचा पासपोर्ट गरजेचा असतो?

अमेरिकन नागरिक असलेल्या १४ वर्षीय मुलांसाठी कोणत्या प्रकारचा पासपोर्ट गरजेचा असतो?

googlenewsNext

प्रश्न: माझी मुलगी अमेरिकन नागरिक आहे. ती १४ वर्षांची असून तिच्या पासपोर्टची वैधता आम्ही दूतावासात जाण्याआधीच संपणार आहे. मग तिला प्रौढांसाठी पासपोर्ट लागेल की लहान मुलांसाठीचा? नव्या पासपोर्टसाठी अर्ज करताना तिच्या सध्याच्या पासपोर्टची वैधता संपण्याची वाट पाहावी का?

उत्तर: तुमच्या मुलीचं वय १४ वर्षे असल्यानं ती पाच वर्षांची वैधता असलेल्या पासपोर्टसाठी पात्र आहे. वयाची १६ वर्षे पूर्ण केल्यानंतर अमेरिकेच्या नागरिकाला १० वर्षांची वैधता असलेला पासपोर्ट मिळू शकतो. प्रौढांना दिल्या जाणाऱ्या अमेरिकन पासपोर्टची वैधता साधारणत: १० वर्षे इतकी असते. तर लहान मुलांच्या पासपोर्टची वैधता पाच वर्षे असते.

जुन्या पासपोर्टची वैधता संपल्यानंतर तुम्ही नव्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. पासपोर्टचं नुतनीकरण करण्यासाठी निश्चित वेळ नाही. कदाचित पासपोर्टची मुदत वाढणार हे लक्षात घ्या. तुम्हाला प्रवास करण्यासाठी नव्या पासपोर्टसाठी अर्ज करावा लागेल. त्यासाठी येणाऱ्या १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी त्यांच्या दोन्ही पालकांना सोबत आणावं. याबद्दलची अधिक माहिती आमच्या https://travel.state.gov/content/travel/en/passports/need-passport/under-16.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रश्न: माझं मूल त्याचाकडे असलेल्या अमेरिकेच्या सध्याच्या पासपोर्टची वैधता संपण्यापूर्वी १६ वर्षांचं होईल. त्यानं १६ वर्षे पूर्ण करताच आम्ही त्याच्याकडे असणाऱ्या पासपोर्टचं १० वर्षांसाठी नुतनीकरण करावं का? त्याच्याकडे असलेला पासपोर्ट अद्याप वैध आहे. 

उत्तर: नाही, तुम्हाला नव्या पासपोर्टसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. पाससोर्टची मुदत संपल्यानंतर तो प्रवासाठी वैध असणार नाही. त्यासाठी १६ आणि १७ वर्षांच्या अर्जदारांनी दूतावासात येऊन अर्ज करावा. त्यावेळी त्यांच्यासोबत एका पालकानं हजर असणं आवश्यक आहे. पासपोर्टसाठी अर्ज करताना पालकांची संमती आहे, हे स्पष्ट होण्यासाठी पालकांनी उपस्थित राहणं गरजेचं असतं. अमेरिकन नागरिकानं वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर अशा प्रकारच्या संमतीची आवश्यकता नसते.

अमेरिकन दूतावास आपत्कालीन पासपोर्ट आणि नागरिकत्व सुविधासांठीच उपलब्ध आहे. दूतावासातील कामाची माहिती आम्ही संकेतस्थळाच्या माध्यमातून देऊ. पासपोर्टबद्दल तुमचे काही अधिकचे प्रश्न किंवा शंका असल्यास त्यासाठी तुम्ही आमच्या https://in.usembassy.gov/u-s-citizen-services/passports/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

तुम्ही किंवा तुमचं मूल अमेरिकेचे नागरिक असल्यास तुम्ही भारतातील अमेरिकन नागरिकांसाठी असलेल्या फेसबुक ग्रुपवर https://www.facebook.com/AmericanCitizenServicesIndia/ फॉलो करू शकता.
 

Web Title: What kind of passport is required for a 14 year old girl who is a US citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.