आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:53 IST2025-06-17T18:52:59+5:302025-06-17T18:53:44+5:30
तेहरान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी इराणने इस्रायली गुप्तचर संस्था अमान (Aman) आणि मोसाद (Mossad)च्या मुख्यालयांना निशाना बनवले.

आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
इस्रायल आणि इराण यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून प्रचंड ताणले आहेत. या दोन्ही देशांत जबरदस्त बॉम्बिंग सुही आहे. यात आतापर्यंत 200 हून अधिक जणांचा बळी गेला असून शेकडो इमारतींचे नुकसान झाले आहे. यातच आज सोमवारी पहाटेच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) इराणने इस्रावर आणखी एक मिसाइल हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायली गुप्तचर संस्थांच्या मुख्यालयांना निशाणा बनवण्यात आले.
तेहरान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी इराणने इस्रायली गुप्तचर संस्था अमान (Aman) आणि मोसाद (Mossad)च्या मुख्यालयांना निशाना बनवले. संबंधित वृत्तानुसार, रविवारी मध्यरात्री (स्थानीक वेळेनुसार) सुरू झालेल्या पहिल्या हल्ल्यानंतर, एका फॉल्स अलार्मने इस्रायली भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर, सोमवारी सकाळच्या सुमारास इराणने एक दुसरी मिसाइल वेव लॉन्च केली. हा हल्ला इस्रायलने कब्जा केलेल्या भागांवर करण्यात आला. हा हल्ला, सध्याच्या संघर्षाची सुरूवात झाल्यापासूनचा दहावा मोठा हल्ला आहे.
माध्यमांतील वृ्त्तानुसार, इराणच्या निशाण्यावर ग्लीलोट येथील इस्रायली लष्कराची गुप्तचर संस्था 'अमान' (Aman)चे लॉजिस्टिक सेंटर होते. येथेच इस्रायली लष्करी गुप्तचर उपक्रम राबविले जातात. याशिवाय, मोसाद मुख्यालय (Herzliya) आणि युनिट 8200 च्या काही बॅकअप ठिकाणेही नष्ट करण्यात आली आहेत. युनिट 8200 इस्रायलची इलेक्ट्रॉनिक पाळत आणि गुप्तचर संस्था आहे. जी साइबर वॉर आणि डेटा इंटेलिजन्सची तज्ज्ञ मानली जाते.
A CLEAR FOOTAGE OF STRIKES ON ISRAELI INTELLIGENCE AGENCY ASSETS pic.twitter.com/pbZMGppGEK
— Iran Observer (@IranObserver0) June 17, 2025
सामान्य घटना -
या हल्ल्यात बस स्टँड अथवा पार्किंग क्षेत्राचे नुकसान झाल्याचे इस्रायली संरक्षण संस्थेचे म्हणणे आहे. मात्र, ही माहिती दिशाभूल करणारी असून प्रत्यक्षात हे हल्ले धोरणात्मक आणि गुप्तचर स्थानांना लक्ष्य करणारे होते, असे इराणी माध्यमांचे म्हणणे आहे.