कोरोनापुढे हतबल अमेरिकेला महागात पडली 'ही' गंभीर चूक? US माध्यमाचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 02:44 PM2020-04-05T14:44:42+5:302020-04-05T14:57:17+5:30

द न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रवासावर बंदी घालण्यापूर्वीच आपल्या नागरिकांना चीनमधून अमेरिकेत 17 शहरांमध्ये आणले होते.  यासाठी तब्बल 1300 उड्डाणे करावी लागली होती.

US media report claims over four lakh people arrived in america from china before travel restrictions sna | कोरोनापुढे हतबल अमेरिकेला महागात पडली 'ही' गंभीर चूक? US माध्यमाचा खळबळजनक खुलासा

कोरोनापुढे हतबल अमेरिकेला महागात पडली 'ही' गंभीर चूक? US माध्यमाचा खळबळजनक खुलासा

Next
ठळक मुद्देट्रम्प यांनी प्रवासबंदी करण्यापूर्वी अमेरिकेने चीनमधून केली होती तब्बल 1300 उड्डाणे चीनमधून अमेरिकेतील 17 शहरांत आले होते अमेरिकन नागरिकअमेरिकेतील द न्यू यॉर्क टाइम्सचा खुलासा


न्यूयॉर्क - अमेरिकेत करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. कोरोनापुढे महास्ता म्हणवली जाणारी अमेरिकाही पुरती हतबल झाली आहे. असे असतानाच अमेरिकेतील एका माध्यमांने धक्कादायक खुलासा केला आहे. चीनने कोरोनाव्हायरसचा खुलासा केल्यानंतर जवळपास 4,30,000 लोक चीनमधून थेट अमेरिकेत आले होते. यातील हजारो लोक चीनमधील वुहान शहरातून आले होते. चीनमधील वुहान शहरातूनच डिसेंबर 2019मध्ये  कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण समोर आला होता, असे अमेरिकेतील द न्यू यॉर्क टाइम्सने म्हटले आहे.

द न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रवासावर बंदी घालण्यापूर्वीच आपल्या नागरिकांना चीनमधून अमेरिकेत 17 शहरांमध्ये आणले होते.  यासाठी तब्बल 1300 उड्डाणे करावी लागली होती.


द न्यू यॉर्क टाइम्सने दावा केला आहे, की दोन्ही देशांच्या आकडेवारीनुसार, चीनीमधील अधिकाऱ्यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच आंतरराष्ट्रीय आरोग्यअधिकाऱ्यांना रहस्यमय निमोनिया सारख्या आजाराबद्दल माहिती दिली होती. यामुळेच, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रवासावर बंदी घालण्यापूर्वीच दोन महिन्यांत 4.30 लाख लोकांना चीनमधून अमेरिकेत आणले होते. या वृत्तात असेही म्हणण्यात आले आहे, की यावेळी विमानतळांवर टेस्ट आणि चीनहून आलेल्या प्रवाशांशी संपर्क साधण्यासाठी फारशी बंधनं नव्हती. 

अमेरिकेत जानेवारीच्या मध्यात आरोग्य तपासणीला सुरुवात झाली. त्यावेळी ही तपासणी केवळ, जे लोक वुहानमध्ये होते आणि लॉस एंजिल्स, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्कमधील विमान तळांवर आहेत त्यांच्या साठीच होती, तोवर जवळपास 4000 लोक आधीच वुहानहून सरळ आमेरिकेत आलेले होते, असेही या वृत्तात चीनमधील एक विमान डाटा कंपनी VariFlightच्या हवाला देत सांगण्यात आले आहे. 

Web Title: US media report claims over four lakh people arrived in america from china before travel restrictions sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.