इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 10:10 AM2020-07-24T10:10:48+5:302020-07-24T10:43:52+5:30

या घटनेमुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढला आहे.

Two US fighter jets near Iranian passenger plane over Syrian airspace: Pilot | इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला

इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला

Next
ठळक मुद्देमहान एअरलाइन्सच्या विमानात बसलेले काही प्रवासी विमानात बेशुद्ध झाले. याप्रकरणी सध्या इराणने चौकशीचे आदेश दिले आहेत.

तेहरान :     सीरियाच्या आकाशात विमानअपघात थोडक्यात टळला. इराणचे प्रवासी विमान सीरियाच्या एअरस्पेसमधून उड्डाण करत होते. यादरम्यान दोन अमेरिकन लढाऊ विमाने त्या विमानच्या दिशेने आले. यावेळी हा अपघात टाळण्यासाठी विमानाच्या पायलटने अल्टीट्युड बदले, त्यामुळे विमानातील काही प्रवासी जखमी झाले.

महान एअरलाइन्सच्या विमानात बसलेले काही प्रवासी विमानात बेशुद्ध झाले. हे विमान तेहरानहून बेरूतला जात होते. याप्रकरणी सध्या इराणने चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, अमेरिकन वायुसेनेचे म्हणणे आहे की, एफ -१५ लढाऊ विमाने सुरक्षित अंतरावर होती. 

दरम्यान,  या घटनेमुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढला आहे. तेहरान आणि वॉशिंग्टनमधील संबंध २०१८ पासून बिघडले आहेत. ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या २०१५ च्या अणुकरारातून बाजूला झाले आणि इराणच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवण्यासाठी कठोर बंदी लागू केली होती.

इराणची अधिकृत वृत्तसंस्था आयआरआयबीच्या म्हणण्यानुसार, एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक वृद्ध प्रवासी विमानात पडल्याचे दिसते. या सर्व प्रवाशांना बेरूत विमानतळावर उतरविण्यात आले. जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार करण्यात आले. यानंतर हे विमान तेहरानला परतले आहे.

या भागात अमेरिकन जवानांची देखरेख करणारे यूएस आर्मी सेंट्रल कमांड म्हणाले की, एफ -१५ लढाऊ विमान इराणी विमानाचे व्हिज्युअल निरीक्षण करीत होते. हे निरीक्षण ज्यावेळी सुरू होते, त्यावेळी विमान सीरियामधील तानफ गॅरीसनजवळून जात होते. ज्या ठिकाणी अमेरिकन सैन्य तैनात आहे.

आणखी बातम्या...

राजस्थानच्या राजकारणातला आजचा दिवस महत्वाचा; सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांच्या याचिकेवर निर्णयाची शक्यता

"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?"

बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्... 

राम मंदिराचे भूमिपूजन अशुभ मुर्हूतावर? शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींकडून प्रश्नचिन्ह    

मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान

Web Title: Two US fighter jets near Iranian passenger plane over Syrian airspace: Pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.