2022 मध्ये एलियन्ससोबत होणार लढाई, अंधारात बुडणार संपूर्ण पृथ्वी...! टाइम ट्रेव्हलर्सचा भयानक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 04:55 PM2021-12-31T16:55:08+5:302021-12-31T16:57:47+5:30

"महाकाय एलियन पृथ्वीवर आक्रमण करतील आणि त्यांचे मानवतेसोबत युद्ध होईल. राक्षसारासखे दिसणारे हे प्राणी 7 फूट उंच आणि गडद तपकिरी रंगाचे असतील. 'आपण ज्यांना एलियन म्हणतो, ते 2022 मध्ये पृथ्वीवर दिसतील. याचा अचूक दिवस 24 मे 2022 असू शकतो."

there will be a battle with aliens, the whole earth will be plunged into darkness In 2022 Terrible claim of time travelers | 2022 मध्ये एलियन्ससोबत होणार लढाई, अंधारात बुडणार संपूर्ण पृथ्वी...! टाइम ट्रेव्हलर्सचा भयानक दावा

2022 मध्ये एलियन्ससोबत होणार लढाई, अंधारात बुडणार संपूर्ण पृथ्वी...! टाइम ट्रेव्हलर्सचा भयानक दावा

googlenewsNext

येणारे नवे वर्ष 2022 साठी बाबा वँगापासून ते नॉस्ट्रॅडेमसपर्यंत अनेकांनी वेगवेगळे दावे आणि भविष्यवाणी केली आहे. आता या साखळीत स्वतःला टाईम ट्रॅव्हलर्स म्हणवणारे लोकही सामील झाले आहेत. अशा लोकांचे टिकटॉकवर लाखो फॉलोअर्सदेखील आहेत. या टाईम ट्रॅव्हलर्सच्या म्हणण्याप्रमाणे, येणाऱ्या नव्या वर्षात, एलियन्ससोबत युद्ध होऊ शकते आणि समुद्रात बुडलेल्या अटलांटिस या पौराणिक शहराचा शोधही लागू शकतो. एका ट्रॅव्हलरने तर, संपूर्ण पृथ्वी अंधारात बुडेल आणि इजिप्तचे पिरॅमिड्स हवेत उडतील, असाही दावा केला आहे.

स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या @aesthetictimewarper मे म्हटले आहे, की 2 फेब्रुवारी रोजी अटलांटिक महासागरात अटलांटिस नावाचे शहर शोधले जाईल. याच महिन्यात एक चर्चित व्यक्ती समोर येईल आणि आपण आपल्या मृत्यूसंदर्भात जगाला उल्लू बनवल्याचे स्वतःच कबूल करेल, असेही त्याने म्हटले आहे. याच बरोबर, टिकटॉक वापरकर्ता @futuretimetraveller म्हणाला, वर्ष 2022 मध्ये विविध महान विनाशक घटना घडतील.

एका भीषण ज्‍वालामुखीचा स्‍फोट होईल -
या ट्रॅव्हलरने असाही दावा केला आहे, की महाकाय एलियन पृथ्वीवर आक्रमण करतील आणि त्यांचे मानवतेसोबत युद्ध होईल. राक्षसारासखे दिसणारे हे प्राणी 7 फूट उंच आणि गडद तपकिरी रंगाचे असतील. 'आपण ज्यांना एलियन म्हणतो, ते 2022 मध्ये पृथ्वीवर दिसतील. याचा अचूक दिवस 24 मे 2022 असू शकतो. आणखी एक कथित टाइम ट्रॅव्हलर @thatonetimetraveler ने म्हटले आहे, की एका मोठ्या ज्वालामुखीचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होईल.

याशिवाय, अमेरिकेवरील अलकायदाच्या 9/11 च्या हल्ल्याबरोबरच त्सुनामीपर्यंत अचूक भविष्यवाणी करणाऱ्या बुल्‍गेरियाच्या बाबा वेंगानेही, 2022मध्ये एक घातक व्हायरस येईल, एलियन पृथ्वीवर हल्ला करतील. नाकतोड्यांच्या हल्ल्यांमुळे भारतावर उपासमारीची वेळ येईल, असा इशारा दिला आहे. 

Web Title: there will be a battle with aliens, the whole earth will be plunged into darkness In 2022 Terrible claim of time travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.