२६/११तील दोषी तहव्वूर राणाला जामीन नको; अमेरिकेची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 03:02 AM2020-06-22T03:02:27+5:302020-06-22T06:45:13+5:30

तो भारतातील संभाव्य देहदंडाची शिक्षा टाळण्यासाठी फरार होण्याची भीती आहे व त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्या संबंधात तणाव निर्माण होईल, असे म्हटले.

Tahavur Rana not wanted bail - US role | २६/११तील दोषी तहव्वूर राणाला जामीन नको; अमेरिकेची भूमिका

२६/११तील दोषी तहव्वूर राणाला जामीन नको; अमेरिकेची भूमिका

Next

वॉशिंग्टन : मुंबई हल्ल्यातील (२६/११) दोषी व मूळचा पाकिस्तानचा; परंतु आता कॅनडाचा व्यावसायिक तहव्वूर राणा याला जामीन देण्यास अमेरिकेने विरोध करताना त्याची सुटका झाल्यास तो भारतातील संभाव्य देहदंडाची शिक्षा टाळण्यासाठी फरार होण्याची भीती आहे व त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्या संबंधात तणाव निर्माण होईल, असे म्हटले.
राणाला जामीन दिल्यास तो न्यायालयात हजर राहील याची कोणतीही हमी नाही व त्यातून अमेरिका-भारत संबंधात तणाव निर्माण होईल, असे गेल्या आठवड्यात लॉस एंजिलिसमध्ये फेडरल न्यायालयात अमेरिकेचे सहायक अ‍ॅटर्नी जॉन जे. लुलेजियन यांनी म्हटले. राणा याने मी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे सांगितल्यानंतर अनुकंपा म्हणून त्याला जामिनावर सोडण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्याची सुटका झाल्यावर त्याला १० जून रोजी पुन्हा अटक करण्यात आली.
भारतात राणा याला फरार जाहीर करण्यात आलेले असून, त्याला आमच्या हवाली करावे अशी विनंती भारताने केलेली आहे. राणा याच्या अर्जावर ३० जून रोजी कॅलिफोर्नियाचे सेंट्रल डिस्ट्रिक्ट जज जॅक्वेलीन चुलजीएन सुनावणी करणार आहेत.

Web Title: Tahavur Rana not wanted bail - US role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.