आश्चर्यच! विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बसला, अडीच तास हवेत लटकला, तरी जिवंत राहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:39 PM2021-11-29T12:39:19+5:302021-11-29T12:39:59+5:30

Jara Hatke News: विमानाच्या पंखाखाली, लँडिंग गिअरमध्ये लपून प्रवास करण्याचा प्रयत्न करून अनेकांनी आपला जीव गमावल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून तब्बल अडीच तास प्रवास करूनही एक अवलिया जिवंत राहिल्याची आश्चर्यजनक घटना अमेरिकेत घडली आहे.

Surprise! Sitting in the landing gear of the plane, hung in the air for two and a half hours, but survived | आश्चर्यच! विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बसला, अडीच तास हवेत लटकला, तरी जिवंत राहिला

आश्चर्यच! विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बसला, अडीच तास हवेत लटकला, तरी जिवंत राहिला

Next

वॉशिंग्टन - हजारो फूट उंचावरून उडणाऱ्या विमानाला लटकून प्रवास करणे निव्वळ अशक्य. तरीही विमानाच्या पंखाखाली, लँडिंग गिअरमध्ये लपून प्रवास करण्याचा प्रयत्न करून अनेकांनी आपला जीव गमावल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून तब्बल अडीच तास प्रवास करूनही एक अवलिया जिवंत राहिल्याची आश्चर्यजनक घटना अमेरिकेत घडली आहे. हा तरुण विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बसून राहिला. त्यानंतर तो सुमारे अडीच तास तिथे राहिला. हे विमान उतरल्यावर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी त्याला बसलेला पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात नेले. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार ग्वाटेमाला येथून मियामीसाठी एका अमेरिकन विमानाने उड्डाण केले. मात्र विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसोबत या विमानातून अजून एक व्यक्ती प्रवास करत होती. मात्र ही व्यक्ती विमानात नाही तर विमानाच्या लँडिंग गिअरवर बसली होती. ग्वाटेमाला येथून मियामीला जाण्यासाठी या विमानाला सुमारे २ तास ३० मिनिटे लागली, तोपर्यंत हा अवलिया ३३ हजार फूट उंचीवर लँडिंग गिअरजवळ बसून राहिला. एवढेच नाही तर तो जिवंत राहिला.

कस्टम विभागाने याबाबत माहिती देताना सांगितले की, मियामी विमानतळावर एका २६ वर्षीय व्यक्तीला पकडण्यात आले आहे. तो ग्वाटेमाला येथून येणाऱ्या एका विमानाच्या लँडिंग गिअरच्या बॉक्समध्ये लपून बसला होता. शनिवारी घडलेल्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये विमान लँड झाल्यानंतर विमानतळ कर्मचारी लँडिंग गिअरमधून या व्यक्तीला बाहेर काढताना दिसत आहे. ही व्यक्ती खूप घाबरलेली होती. त्याला रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेण्यात आले.

असा प्रकार आधी कधी घडला नसावा. अडीच तासांच्या विमान प्रवासामध्ये कुठलीही व्यक्ती लँडिंग गिअरजवळ बसून प्रवास केल्यानंतर जिवंत राहिल्याचे क्वचितच घडले. असेल. अशा बहुतांश घटनांमध्ये असा प्रवास करणारे विमानातून खाली पडले. विमान उड्डाण करत असताना किंवा उतरताना अपघात होऊन मृत्युमुखी पडले. काही घटनांमध्ये आकाशातील थंड तापमान आणि विरळ वातावरणामुळे अशा प्रवाशांचा मृत्यू झाला.

Web Title: Surprise! Sitting in the landing gear of the plane, hung in the air for two and a half hours, but survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.