Sri Lanka strongman Gotabaya Rajapaksa wins presidential elections | गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती, मोदींनी दिल्या शुभेच्छा! 
गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती, मोदींनी दिल्या शुभेच्छा! 

कोलंबो : श्रीलंकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी झाले आहेत. गोटाबाया राजपक्षे हे श्रीलंकेचे आठवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्यानंतर गोटाबाया राजपक्षे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून गोटाबाया राजपक्षे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, यावेळी दोन्ही देशातील संबंध वाढवण्यासाठी शांती, समृद्धी आणि सुरक्षा क्षेत्रात मिळून काम करण्याची आशा नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, श्रीलंकेत शनिवारी राष्ट्रपती पदासाठी मतदान झाले. 35 उमेदवार या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, खरी लढत ही गोटाबाया राजपक्षे आणि सजित प्रेमदासा यांच्यात पाहायला मिळाली. सजित प्रेमदासा हे माजी राष्ट्रपती रणसिंघे प्रेमदासा यांचे सुपुत्र आहेत. तर गोटाबाया राजपक्षे हे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे भाऊ आहेत. 

श्रीलंकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर अनेक देशांचे लक्ष लागून राहिले होते. श्रीलंकेची आणि चीनची वाढती मैत्री लक्षात घेऊन भारताने देखील या निवडणुकीवर लक्ष ठेवले होते.

Web Title: Sri Lanka strongman Gotabaya Rajapaksa wins presidential elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.