पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 12:52 PM2019-12-17T12:52:23+5:302019-12-17T13:04:00+5:30

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

A special court hands death penalty to former Pakistani military dictator Pervez Musharraf in high treason case | पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा

Next

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानमधील विशेष कोर्टाने ही शिक्षा सुनावली असून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप आहे.  विशेष कोर्टाचे न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय खंडपीठाने परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावली.

2007 मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी राष्ट्रपती असताना आणीबाणी लागू केली होती. यावरून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला सुरू होता. एखाद्या सेवेतील अथवा निवृत्त लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची ही पहिलीच वेळ आहे. परवेझ मुशर्रफ 1999 ते 2008 या काळात सत्तेत होते.

देशात आणीबाणी लादणे, सत्ता उलथविणे, संविधान नष्ट करणे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना अटक करणे आदी आरोप परवेझ मुशर्रफ यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. परवेझ मुशर्रफ यांनी 2007 ला शंभरहून अधिक न्‍यायाधीशांना पदावरून हटवले होते. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद येथील त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाकडे मुशर्रफ यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. याशिवाय, परवेझ मुशर्रफ यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येसह अनेक खटले सुरू आहेत.

Web Title: A special court hands death penalty to former Pakistani military dictator Pervez Musharraf in high treason case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.