१,२,३...९ नव्हे तर तब्बल १० मुलांना दिलाय जन्म; महिलेचा दावा, नवा जागतिक रेकॉर्ड बनणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 09:52 AM2021-06-09T09:52:53+5:302021-06-09T09:54:16+5:30

याआधीच जुळ्या मुलांची आई असलेल्या सिथोलेने ७ मुलं आणि ३ मुलींना जन्म दिला आहे.

South African woman claims gives birth to ten babies breaking Guinness Record | १,२,३...९ नव्हे तर तब्बल १० मुलांना दिलाय जन्म; महिलेचा दावा, नवा जागतिक रेकॉर्ड बनणार ?

१,२,३...९ नव्हे तर तब्बल १० मुलांना दिलाय जन्म; महिलेचा दावा, नवा जागतिक रेकॉर्ड बनणार ?

Next
ठळक मुद्देसुरुवातीला डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर तिच्या पोटात ६ मुलं असल्याचं सांगितलं होतं. गोसियाने थमारा सिथोलच्या या दाव्याची पुष्टी अद्याप डॉक्टर अथवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसद्वारे केली नाही. मे महिन्यात मालीमध्ये (Mali) एका महिलेने चक्क एकत्र नऊ बाळांना जन्म दिला होता

दक्षिण आफ्रिकेत(South Africa) एका महिलेने तब्बल १० मुलांना जन्म देऊन नवा विश्वरेकॉर्ड बनवला आहे. प्रिटोरिया(Pretoria) राहणाऱ्या गोसियामे थमारा सिथोले(Gosiame Thamara Sithole) ने दावा केलाय की, तिने ७ मुलांना आणि ३ मुलींना जन्म दिला आहे. ३७ वर्षीय गोसियामे थमारा सिथोले या महिलेने ७ जून रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियाच्या हॉस्पिटलमध्ये १० मुलांना जन्म दिला आहे.

याआधीच जुळ्या मुलांची आई असलेल्या सिथोलेने ७ मुलं आणि ३ मुलींना जन्म दिला आहे. या घटनेमुळे स्वत: ती महिला अचंबित झाली आहे. कारण सुरुवातीला डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर तिच्या पोटात ६ मुलं असल्याचं सांगितलं होतं. मिररच्या रिपोर्टनुसार, गोसियामे थमारा सिथोलेने दावा केलाय की, तिने नैसर्गिक पद्धतीने गर्भवती झाली आहे. परंतु गर्भधारणा तिच्यासाठी सोप्पी नव्हती कारण या काळात तिच्या पायात प्रचंड वेदना होत होत्या. हार्टबर्नसारख्या समस्येचाही सामना करावा लागला.

गोसियाने थमारा सिथोलच्या या दाव्याची पुष्टी अद्याप डॉक्टर अथवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसद्वारे केली नाही. जर हा दावा खरा ठरला तर सर्वात जास्त मुलांना जन्म देण्याचा हा जागतिक रेकॉर्ड बनेल. एका प्रेग्नेंसीमध्ये सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा रेकॉर्ड सध्या हलीमा सिस्से(Halima Cisse) नावाच्या महिलेवर आहे. या महिलेने मे महिन्यात मोरक्कोच्या एका हॉस्पिटलमध्ये एकाचवेळी ९ मुलांना जन्म दिला होता. हायरिस्क प्रेग्नेंसी पाहता गोसियामे थमारा सिथोलेला चिंता होती की, कदाचित त्यांची मुले जिवंत राहू शकणार नाहीत. परंतु सर्व मुलं जिवंत असून पुढील काही महिने त्यांना इन्क्यूबेटरोमध्ये ठेवलं जाणार आहे. मुलांच्या जन्मानंतर सिथोलेचे पती तेबोहो त्सोतेत्सीने सांगितले की, तो खूप आनंदी आणि भावूक आहे.

एकत्र एकावेळी नऊ बाळांना जन्म देण्याची ही घटना

पश्चिम आफ्रिकेच्या (West Africa) मालीमध्ये (Mali) एका महिलेने चक्क एकत्र नऊ बाळांना जन्म (Women gives birth to 9 Babies) दिला होता. या महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरही हैराण झाले. कारण प्रेग्नन्सीवेळी महिलेच्या गर्भात केवळ सात बाळच डिटेक्ट झाले होते. बाळांमध्ये पाच मुली आणि चार मुलं आहेत. प्रेग्नेन्सी दरम्यान मोरक्को आणि मालीमध्ये सिसेचा अल्ट्रासाउंडही करण्यात आला होता. अल्ट्रासाउंड बघितल्यावर डॉक्टरांना केवळ सात बाळच दिसले होते. पण डॉक्टर अल्ट्रासाउंडमध्ये दोन बाळ ट्रॅक करू शकले नाहीत. सर्वच बाळांचा जन्म सिजेरिअन सेक्शनने झाला.

Read in English

Web Title: South African woman claims gives birth to ten babies breaking Guinness Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.