सॅनिटाईज केलेल्या हातांनी मेणबत्ती लावताना उडाला भडका, महिला गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 10:20 AM2020-09-06T10:20:42+5:302020-09-06T10:22:14+5:30

मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर हे आता नित्याचेच बनले आहे. जोपर्यंत कोरोनावरील लस बाजारात येत नाही, तोपर्यंत या त्रिसुत्रीचा वापर बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

Sanitized hands exploded while lighting a candle, the woman serious | सॅनिटाईज केलेल्या हातांनी मेणबत्ती लावताना उडाला भडका, महिला गंभीर

सॅनिटाईज केलेल्या हातांनी मेणबत्ती लावताना उडाला भडका, महिला गंभीर

Next
ठळक मुद्देअमेरिकेतील एका घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या टेक्सास येथे सॅनिटायझरची बाटली फुटल्याने एका महिलेचं संपूर्ण शरीर जळाल्याची घटना घडली आहे.

राज्यात ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या कोरोना प्रादुर्भावाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. १ ते ५ सप्टेंबर या कालावधीत राज्यात तब्बल ९१ हजार १० रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात शनिवारी पुन्हा एकदा २० हजार ४८९ रुग्ण निदानाची नोंद झाली असून, ही आतापर्यतची सर्वाधिक वाढ आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त झाले असून राज्य सराकारने एसएमएस पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर हे आता नित्याचेच बनले आहे. जोपर्यंत कोरोनावरील लस बाजारात येत नाही, तोपर्यंत या त्रिसुत्रीचा वापर बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मात्र, याचा वापर करताना काळजी घेणे किती आवश्यक आहे, हे अमेरिकेतील एका घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या टेक्सास येथे सॅनिटायझरची बाटली फुटल्याने एका महिलेचं शरीर जळाल्याची घटना घडली आहे. कारण, ज्यावेळी सॅनिटायझरची बाटली फुटली, नेमकं त्याचवेळी संबंधित महिला मेणबत्ती पेटवत होती. त्यामुळे, भडका होऊन महिलेचं शरीर आगीच्या तावडीत सापडलं. पीडित महिलेवर अतिदक्षता केअर विभागात उपचार सुरू आहेत. 

पीडित महिलेचं नाव कैट वाइस असून अतिशय वेदना होत असल्याचं तिने सांगितलं. ज्यावेळी आगीची घटना घडली, त्यावेळी मी हिंमत करुन माझे कपडे फेकून दिले. शेजारी व माझ्या मुलींनी मदत केली. कॅट यांना तीन मुली आहेत. कॅट यांची परिस्थिती नाजूक असून उपचाराच्या खर्चासाठी मदत मागण्यात येत आहे. 

सॅनिटायजरचा वापर करताना काळजी घ्या

जर तुम्ही हाताला सॅनिटायजर लावले असेल, तर काही वेळासाठी किचनमध्ये जाणे टाळा, ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहा. लायटर, माचिस बॉक्सचा वापर करु नका. कारण, सॅनिटायजरमध्येही 75 टक्के अल्कोहल असते. लहान मुलांनाही सॅनिटायझरपासून दूरच ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.  

साबणाचा वापर करा

अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिवेंशनच्या अनुसार, दरवेळेस सॅनिटायजरने हात स्वच्छ करावेत असे नाही. तर, साबणानेही 20 सेकंद हात धुवून कोरोनापासून बचाव करता येईल. त्यामुळे सॅनिटायजरसाठी साबणही उत्तम  पर्याय आहे.  
 

Web Title: Sanitized hands exploded while lighting a candle, the woman serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.