Afghanistan: तालिबानसोबत युद्धाची तयारी? रशिया ताजिकिस्तानमध्ये 30 अत्याधुनिक रणगाडे पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 11:22 AM2021-09-12T11:22:34+5:302021-09-12T11:23:16+5:30

Russia preparing for war with the Taliban? अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर रशियाने ताजिकिस्तानच्या सैन्यासोबत मोठ्या प्रमाणावर युद्धाभ्यास करण्यास सुरुवात केली होती. ताजिकिस्तानातील लष्करी तळावर रशियाने अनेक नवनवीन शस्त्रे तैनात केली आहेत.

Russian military base in Tajikistan will get 30 modern tanks by year-end | Afghanistan: तालिबानसोबत युद्धाची तयारी? रशिया ताजिकिस्तानमध्ये 30 अत्याधुनिक रणगाडे पाठविणार

Afghanistan: तालिबानसोबत युद्धाची तयारी? रशिया ताजिकिस्तानमध्ये 30 अत्याधुनिक रणगाडे पाठविणार

Next

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानी (Taliban) दहशतवाद्यांनी ताबा मिळविला आहे. याविरोधात भल्या भल्या शक्तींनी गुडघे टेकलेले असताना ताजिकिस्तानने कठोर भूमिका घेतली आहे. तालिबानने त्यांच्या सरकारमध्ये अल्पसंख्यांकांना तुच्छ लेखल्याने ताजिकिस्तान भडकला आहे. ताजिकिस्तानने पाकिस्तानचे नाव न घेता आरोप केला की पंजशीरमध्ये तिसऱ्या देशाने तालिबानला हल्ला करण्यास मदत केली. या साऱ्या पार्श्वभूमीवर रशियाने ताजिकिस्तानमध्ये या वर्षाच्या शेवटी आपल्या सैन्य तळावर 30 नवीन रणगाडे पाठविण्याची घोषणा केली आहे. (Russia to reinforce its Tajikistan base with new tanks)

अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर रशियाने ताजिकिस्तानच्या सैन्यासोबत मोठ्या प्रमाणावर युद्धाभ्यास करण्यास सुरुवात केली होती. ताजिकिस्तानातील लष्करी तळावर रशियाने अनेक नवनवीन शस्त्रे तैनात केली आहेत. मध्य आशियावरील रशियाचे वर्चस्व तालिबान, चीन, पाकिस्तानच्या युतीमुळे संकटात असल्याचे रशियाला वाटू लागले आहे. यामुळे रशिया आपल्या सुरक्षेसाठी ताजिकिस्तान, उज्बेकिस्तानला एक बफर झोनच्या रुपात पाहत आहे. 

तालिबानी दहशतवादी ताजिकिस्तानमार्गे चेचेन सारख्या अशांत परिसरात घुसतील व हिंसाचार वाढवतील अशी भीती रशियाला आहे. ताजिकीस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमली रहमोन यांनी आपल्या देशात कट्टरतावाद्यांर कठोर करवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ताजिकिस्तानची आणि अफगाणिस्तानची सीमा 1344 किमी आहे. यातील अधिकतर डोंगररांगा आहेत जिथे लक्ष ठेवणे कठीण आहे. 

रशियाच्या सेंट्रल मिलिट्री डिस्ट्रीक्टचे टँक कमांडर खानिफ बेगलोव यांनी सांगितले की, 30 अत्याधुनिक टँक ताजिकिस्तानात पाठविले जातील. तेथून जुनी शस्त्रे हटविली जातील. रशियाने तालिबान सरकार स्थापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासही नकार दिला आहे. रशिया आणि ताजिकिस्तानने उचललेल्या पावलामुळे अफगाणिस्तानातील वातावरण पुन्हा तंग होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Russian military base in Tajikistan will get 30 modern tanks by year-end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.