इंग्लंडच्या विध्वंसक युद्धनौका काळ्या समुद्रात; रशिया भडकला, दिला थेट इशारा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 07:00 PM2021-06-24T19:00:55+5:302021-06-24T19:06:14+5:30

यासंदर्भात बोलताना क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव म्हणाले, ही जाणूनबुजून केलेली कारवाई आहे. इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब म्हणाले, की त्यांच्या युद्धनौकेवर कुठल्याही प्रकारची फायरिंग करण्यात आलेली नाही. (Russia warns England )

Russia warns England do not provoke us again in black sea | इंग्लंडच्या विध्वंसक युद्धनौका काळ्या समुद्रात; रशिया भडकला, दिला थेट इशारा...!

इंग्लंडच्या विध्वंसक युद्धनौका काळ्या समुद्रात; रशिया भडकला, दिला थेट इशारा...!

Next

मॉस्को - इंग्लंडच्या विध्वंसक युद्धनौका काळ्या समुद्रात आल्याने रशिया भडकला आहे. इंग्लंड जाणूनबुजून चिथावणीखोर कारवाई करत असल्याचा आरोप रशियाने केला आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात त्यांनी मॉस्कोतील इंग्लंडच्या राजदूतांकडेही आपली नाराजी व्यक्त केली आहे. (Russia warns England do not provoke us again in black sea)

रशियाने म्हटले आहे, की इंग्लंडने काळ्या समुद्रात आपल्या हद्दीत घुसखोरी करण्याचा आणि चिथावणीखोर कारवाई करण्याचा प्रयत्न करू नये. मात्र, यावर इंग्लंडने, रशियाने केलेले आरोप चुकीचे असून आपली युद्धनौका यूक्रेनच्या सीमेत होती, असे म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव म्हणाले, ही जाणूनबुजून केलेली कारवाई आहे. इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब म्हणाले, की त्यांच्या युद्धनौकेवर कुठल्याही प्रकारची फायरिंग करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी रशियाने दावा केला होता, की इंग्लंडची विध्वसंक युद्धनौका काळ्या समुद्रात त्यांच्या सीमेत घुसत होती. तिला रोखण्यासाठी इशारा म्हणून फायरिंग करण्यात आली आणि तिच्या मार्गात बॉम्बचा वर्षाव करण्यात आला.

Chinese Corona Vaccine: 'या' देशांना महागात पडला चिनी कोरोना लशीचा वापर! आता पाकिस्तान-नेपाळचं काय होणार?
 
तर दुसरीकडे रशिया आणि युरोपीय संघ यांच्या संबंधांत सुदारणा होताना दिसत आहे. जर्मनी आणि फ्रान्स यांनी रशिया सोबतच्या संबंधांत सुधारणा आणि ते मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे रशियानेही समोर येत याचे स्वागत केले आहे. गेल्या काही महिन्यांत रशिया आणि युरोपीयन संघ यांचे संबंध कमालीचे ताणले गेल्याचे दिसत होते. आता फ्रान्स आणि जर्मनीने एकत्रितपणे रशियासोबत एक शिखर परिषद घेण्याचे ठरविले आहे. क्रेमलिनने म्हटले आहे, की दोन्हीकडूनही अशा प्रकारच्या शिखर परिषदेची अत्यंत आवश्यकता होती. 

Web Title: Russia warns England do not provoke us again in black sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.