Russia News: स्वीडन आणि फिनलंड 'नाटो'चे सदस्य होणार? रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:49 PM2022-05-18T17:49:59+5:302022-05-18T17:50:09+5:30

Russia News: सुमारे दीड दिवस चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर 200 पैकी 188 फिन्निश खासदारांनी NATO सदस्यत्वाच्या बाजूने मतदान केले. तर, तुर्कीने फिनलंड आणि स्वीडन दहशतवादी गटांचे गड म्हणून काम करत असल्याचा आरोप करत, आम्ही या विस्ताराला मान्यता देणार नाही, असे म्हटले आहे.

Russia News: Sweden and Finland to join NATO? Russian President Vladimir Putin made the threat | Russia News: स्वीडन आणि फिनलंड 'नाटो'चे सदस्य होणार? रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली धमकी

Russia News: स्वीडन आणि फिनलंड 'नाटो'चे सदस्य होणार? रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली धमकी

Next

Russia News: स्वीडन आणि फिनलंडने नाटोमध्ये सामील होण्यासाठी सदस्यत्व अर्ज सादर केले आहेत. तुर्कस्तानने लष्करी युती थांबवण्याची धमकी देऊनही हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन यांनी फिनिश राष्ट्राध्यक्ष साऊली निनिस्टो यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फिनलंड रशियाबरोबर 1300 किमी सीमा सामायिक करतो. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे स्वीडनही त्रस्त आहे. रशियन आक्रमणाविरूद्ध संरक्षण म्हणून फिनलंड नाटोमध्ये सामील झाल्यामुळे अनेक दशकांची लष्करी अलायनमेंट संपुष्टात येईल. 

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी धमकी दिली आहे की, नाटोचा विस्तार रशियाला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडू शकतो. पण फिनलंड आणि स्वीडनच्या सदस्यत्वात जो अडथळा निर्माण होऊ शकतो तो अलायन्समधूनच येऊ शकतो. तर, नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी वारंवार आग्रह धरला आहे की, ते दोन्ही देशांचे खुल्या हाताने स्वागत करतात. दुसरीकडे, तुर्कीने फिनलंड आणि स्वीडन दहशतवादी गटांचे गड म्हणून काम करत असल्याचा आरोप करत, आम्ही या विस्ताराला मान्यता देणार नाही, असे म्हटले आहे.

सर्व सदस्यांची संमती आवश्यक आहे
वॉशिंग्टनमधील परराष्ट्र प्रवक्ते नेड प्राइस यांनी विश्वास व्यक्त केला की, अंकारा दोन्ही देशांच्या युतीमध्ये प्रवेश करण्यास अडथळा आणणार नाही. दुसरीकडे या ऐतिहासिक बोलीसाठी अँडरसन आणि निनिस्टो अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांची भेट घेणार आहेत. EU परराष्ट्र व्यवहार प्रमुख जोसेप बोरेल यांनी सांगितले की, ब्रुसेल्समध्ये EU संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर या बोलीला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नाटो सदस्यांची संख्या वाढेल आणि त्यामुळे युरोपचे सामर्थ्य आणि सहकार्य वाढेल, असे ते म्हणाले. कोणतीही सदस्यत्वाची बोली तेव्हाच स्वीकारली जाते, जेव्हा NATO चे सर्व 30 सदस्य त्यास सहमती देतात.

सदस्यत्वावर दीर्घ वाद
सुमारे दीड दिवस चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, 200 पैकी 188 फिन्निश खासदारांनी NATO सदस्यत्वाच्या बाजूने मतदान केले. फिनलंडच्या 75 वर्षांच्या लष्करी अलायनमेंट धोरणाच्या अगदी विरुद्ध जाऊन हा मतदान झाले. चर्चेला सुरुवात करताना, फिनिश राष्ट्राध्यक्ष सना मारिन यांनी संसदेत सांगितले की, रशिया हा एकमेव देश आहे जो युरोपच्या सुरक्षेला धोका आहे. सध्याच्या परिस्थितीत आपल्या देशाची सुरक्षा महत्वाची आहे. 

सार्वजनिक मत काय आहे
स्वीडन-फिनलंड हे जवळपास शतकभर रशियन साम्राज्याचा भाग होते. 1917 मध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 1939 मध्ये सोव्हिएत युनियनने त्यावर हल्ला केला. लोकांच्या मतानुसार, सुमारे तीन चतुर्थांश फिन्निश लोकांना अलायन्ससोबत जायचे आहे. स्वीडनचा निर्णय खूपच धक्कादायक आहे, कारण ते दुसऱ्या महायुद्धात पूर्णपणे तटस्थ राहिले  होते. तसेच, गेल्या 200 वर्षांपासून लष्करी अलायन्सच्या बाहेर आहेत.
 

Web Title: Russia News: Sweden and Finland to join NATO? Russian President Vladimir Putin made the threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.