कंदहार विमानतळावर रॉकेट हल्ला; तालिबान आणि अफगाण लष्करातील संघर्ष सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 10:49 AM2021-08-01T10:49:31+5:302021-08-01T10:50:49+5:30

अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात चकमक सुरू असतानाच कंदहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

rockets fired at kandahar international airport in afghanistan taliban clashes | कंदहार विमानतळावर रॉकेट हल्ला; तालिबान आणि अफगाण लष्करातील संघर्ष सुरूच

कंदहार विमानतळावर रॉकेट हल्ला; तालिबान आणि अफगाण लष्करातील संघर्ष सुरूच

Next

काबूल: अफगाणिस्तानमध्ये मागील काही महिन्यांपासून रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. अमेरिकन सैन्य माघारी जाणार असल्याच्या घोषणेनंतर हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तालिबान दहशतवाद्यांकडून मागील काही महिन्यांपासून जोरदार हल्ले सुरू आहेत. यातच आता अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात चकमक सुरू असतानाच कंदहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या वृत्ताला विमानतळ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. (rockets fired at kandahar international airport in afghanistan taliban clashes)

तालिबानकडून अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागांवर कब्जा मिळवण्याचे प्रयत्न केले जात असून, मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. कंदहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएफपीने केट हल्लासंदर्भातील वृत्त दिले आहे. या हल्ल्याबद्दल अधिकची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यापूर्वी ७ एप्रिल २०२१ रोजीही कंदहार विमानतळावर तालिबानकडून हल्ला करण्यात आला होता.

“मोदी सरकारने वेळीच पावले उचलली असती, तर कोरोनाचे सुमारे १ लाख मृत्यू टाळता आले असते”

कंदहार हेच तालिबानचे मुख्यालय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घोषणेपासून तालिबानने अफगाणमधील विविध भागांवर आक्रमण करण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील ८५ भागांवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबानने केला होता. पूर्वी कंदहार हेच तालिबानचं मुख्यालय होते. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंदहारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. 

२४ हजार तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या चार महिन्यात ५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, अफगाण सुरक्षा दलाच्या कारवाईत जवळपास २४ हजार तालिबान दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अफगाणिस्तान सरकारने ही माहिती दिली. तालिबानने अफगाणिस्तानमधील विविध भागांमध्ये २२ हजार हल्ले केले. तसेच मॉस्कोमधील तालिबानी शिष्टमंडळाने अफगाणिस्तानच्या ३९८ जिल्ह्यांपैकी २५० जिल्हे ताब्यात घेतल्याचा दावा केलेला आहे.

भारत ‘रेड लिस्ट’ मध्ये! प्रवास केल्यास ३ वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा

दरम्यान, गेल्या १५ दिवसांत एकूण ५६०० कुटुंबांनी त्यांच्या घरातून पलायन केले असल्याचे निर्वासित मंत्रालयाने म्हटले आहे. पुलित्झर पारितोषिक विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांची अफगाणिस्तानात गोळीबारात हत्या केल्यानंतर तालिबानने मृतदेहाचीही विटंबना केली. त्यांची ओळख पटवल्यानंतर तालिबानने हे निर्घृण कृत्य केल्याचे अमेरिकेतील एका नियतकालिकात प्रकाशित झालेल्या वृत्तात म्हटले आहे. 
 

Web Title: rockets fired at kandahar international airport in afghanistan taliban clashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.