मृत घोषित केल्यानंतर काही वेळात पुन्हा जिवंत झाला; 'वेगळंच विश्व' अनुभवल्याचा दावा केला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:16 AM2021-05-10T10:16:37+5:302021-05-10T10:23:20+5:30

जगभरात मृत घोषित केल्यानंतर तीच व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याची घटना अनेकवेळा समोर आली आहे.

Resurrected shortly after being declared dead; Claimed to have experienced a 'different world'! | मृत घोषित केल्यानंतर काही वेळात पुन्हा जिवंत झाला; 'वेगळंच विश्व' अनुभवल्याचा दावा केला!

मृत घोषित केल्यानंतर काही वेळात पुन्हा जिवंत झाला; 'वेगळंच विश्व' अनुभवल्याचा दावा केला!

googlenewsNext

आजकाल या जगात अशा काही आश्चर्यकारक घटना घडत आहेत ज्यावर लोकांना विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. पण जेव्हा लोक ती घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात तेव्हा ते यास नाकारूही शकत नाहीत. जगभरात मृत घोषित केल्यानंतर तीच व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याची घटना अनेकवेळा समोर आली आहे. भारतात देखील अशा घटना घडल्याचे दिसून आले होते. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियामध्ये घडली आहे. एका व्यक्तीला मृत घोषित केल्यानंतर काही वेळेनंतर ती व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही कोणत्याही चित्रपटाची कथा नसून ही एक सत्य घडलेली घटना आहे. 

सदर व्यक्तीचे नाव विल्यम्स आहे आणि तो 57 वर्षांचा आहे. खरं तर, विल्यम्सला 2011 मध्ये काही आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु जेव्हा त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये आणले गेले, तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला. याशिवाय ऑक्सिजनच्या अभावामुळे त्याच्या मेंदूनेही काम करणे बंद केले. अशा परिस्थितीत डॉक्टरांनीही त्यांना मृत घोषित केले. मात्र थोड्या वेळाने विल्यम्स पुन्हा आपले डोळे उघडले आणि त्यानंतर त्याने जे सांगितले ते अतिशय धक्कादायक होते.

महत्त्वाचे म्हणजे  विल्यम्स व्यक्तीला मृत घोषित केल्यानंतर देखील त्या दरम्यान घडलेल्या सर्व गोष्टींचा खुलासा त्या व्यक्तीने पुन्हा जिवंत झालेनंतर सांगितल्या आहे. याशिवाय त्याने डोळे उघडल्यानंतर सांगितलेल्या गोष्टी सत्य होत्या. तथापि, जेव्हा या सर्व गोष्टी घडल्या तेव्हा त्याचा जीव त्याने गमावला होता. पण तरीही त्याला त्या दरम्यान काय काय घडलं हे सर्व काही माहित होते. आपण बर्‍याच लोकांकडून ऐकले आहे की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, सर्वात अगोदर तेजस्वी प्रकाश दिसतो आणि त्यासह एक सावली देखील दिसते, जी आत्म्याला शरीरापासून दूर घेऊन जात असते. पण ज्या गोष्टी विल्यम्सने सांगितलेल्या त्या याच्याशी जुळल्या नाहीत.

विल्यम्सच्या म्हणण्यानुसार, मृत्यूनंतर तीन मिनिटांसाठी तो तिथेच होता आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व हालचाली आणि गोष्टी त्याला जाणवत होत्या. अगदी रुग्णालयातील कर्मचार्‍यांनीही सांगितले की त्या व्यक्तीने सांगितलेल्या सर्व गोष्टी सत्य आहेत. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले असले तरीही, त्याच्या मृत्यूनंतरच्या घडलेल्या सर्व घटना अजूनही त्यांच्या लक्षात आल्या. 

विल्यम्स म्हणाले की वैद्यकीय कर्मचारी त्याला धक्का देत होते आणि त्यावेळी त्याला दोन लोकांचा आवाजही ऐकायला येत होता. यापैकी एक आवाज वैद्यकीय कर्मचार्‍यांचा होता जे त्याला वारंवार धक्के देऊन हलवत होते आणि दुसरा आवाज महिलेचा होता. ती महिला त्याच्या हाताला धरून त्याला छताच्या दिशेने घेऊन जाऊ इच्छित होती. अशा परिस्थितीत त्याने त्या महिलेचे ऐकून छतातुन तिच्यासोबत बाहेर गेला. या व्यतिरिक्त मृत्यूच्या वेळी त्याला असे वाटले की, जी महिला घेऊन जात होती तिला तो ओळखत होता. यासह, त्याला असे वाटले की, ती महिला काही कारणास्तव तेथे आली होती. परंतु त्याचे कारण काय होते हे त्याला माहिती नाही. यानंतर त्याला एक मोठा धक्का बसला आणि सर्व काही त्याच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागले. याचा अर्थ असा की दिलेल्या धक्क्यानंतर तो पुन्हा जिवंत झाला.

Web Title: Resurrected shortly after being declared dead; Claimed to have experienced a 'different world'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.