अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 05:39 IST2025-10-17T05:38:49+5:302025-10-17T05:39:01+5:30
न्यूयॉर्क : अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी पत्रकारांवर एकप्रकारे निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या या ...

अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत
न्यूयॉर्क : अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी पत्रकारांवर एकप्रकारे निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा पत्रकारांनी तीव्र निषेध करत पेंटागॉन सोडले. पेंटागॉन सोडताना पत्रकारांनी त्यांचे ‘ॲक्सेस बॅज’ परत केले आहे. पेंटागॉनमध्ये पत्रकारांना प्रवेश करता यावा म्हणून प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या ओळख पत्राला ‘ॲक्सेस बॅज’ संबोधले जाते.
संरक्षण मंत्री हेगसेथ यांनी लागू केलेले नवीन नियम पत्रकार व वृत्तसंस्थांनी एकमताने नाकारले आहेत. नवीन नियमानुसार संरक्षण मंत्र्यांनी मंजूर केलेली व ते सांगतील तेवढीच माहिती पत्रकारांना प्रसिद्ध करता येणार आहे. त्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची बातमी किंवा माहिती प्रसिद्ध केल्यास संबंधित पत्रकारांना पेंटागॉनमधून काढून टाकले जाऊ शकते. मग, ती माहिती गोपनीय असो किंवा नसो पत्रकारांवर कारवाई होणार आहे.
पत्रकारांनी नियम एकमताने नाकारला
संरक्षण मंत्री हेगसेथ यांनी लागू केलेले नवीन नियम पत्रकार व वृत्तसंस्थांनी एकमताने नाकारले आहेत.
संरक्षण मंत्र्यांचा निर्णय एक प्रकारे पत्रकारांवर निर्बंध घालणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी संबंधित निर्णयाला विरोध करत तो फेटाळून लावला आहे.
या निर्णयाचा विरोध करत बुधवारी सर्व पत्रकार पेंटागॉनमधून बाहेर पडले. त्यावेळी जवळपास ४० ते ५० पत्रकारांनी त्यांचे ‘ॲक्सेस बॅज’
परत केले.