इस्लामाबादेत मौलानांच्या नेतृत्वात आंदोलक एकत्र; पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 02:22 AM2019-11-02T02:22:29+5:302019-11-02T02:22:52+5:30

या आंदोलकांचा आरोप आहे की, अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन ढासळले आहे, कुप्रशासनामुळे सामान्यांच्या समस्या वाढल्या आहेत.

Protesters gathered under the leadership of Maulan in Islamabad; Demand for PM Imran Khan's resignation | इस्लामाबादेत मौलानांच्या नेतृत्वात आंदोलक एकत्र; पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी

इस्लामाबादेत मौलानांच्या नेतृत्वात आंदोलक एकत्र; पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी

Next

इस्लामाबाद : पाकिस्तानातील प्रभावशाली मौलानांच्या नेतृत्वात आंदोलक एकत्र झाले असून, पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी ते करीत आहेत. जमीयत उलेमा-ए-इस्लाम फजलचे प्रमुख मौलाना फजलूर रहमान यांनी २७ ऑक्टोबर रोजी अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत दक्षिण सिंध प्रांतातून ‘आझादी मार्च’ची सुरुवात केली आहे. २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत गडबड झाल्याचा त्यांचा आरोप आहे.

या आंदोलकांचा आरोप आहे की, अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन ढासळले आहे, कुप्रशासनामुळे सामान्यांच्या समस्या वाढल्या आहेत. जमीयत नेत्यांनी सांगितले की, रहमान हे ३१ ऑक्टोबर रोजी इस्लामाबादला पोहोचणार होते. पण, या ताफ्यात शेकडो वाहने असल्याने वेग मंदावला आहे. मौलानांनी सुक्कूर, मुल्तान, लाहोर आणि गुजरानवालाच्या मार्गाने आपला प्रवास केला आणि शुक्रवारी इस्लामाबादला पोहोचले.

Web Title: Protesters gathered under the leadership of Maulan in Islamabad; Demand for PM Imran Khan's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.