China Army Recruitment: शी जिनिपिंग यांच्याकडून आधुनिक युद्धाची तयारी सुरु; चिनी सैन्यात काढली बंपर भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 08:05 PM2021-11-29T20:05:09+5:302021-11-29T20:06:45+5:30

China will Recruit 3 lakhs Soldiers in PLA: जिनपिंग यांनी पीएलएमध्ये तातडीने तीन लाख सैनिक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसीय सैन्याच्या संमेलनामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. 

Preparations for war begin from Xi Jinping; bumper recruitment declarerd in the Chinese army PLA | China Army Recruitment: शी जिनिपिंग यांच्याकडून आधुनिक युद्धाची तयारी सुरु; चिनी सैन्यात काढली बंपर भरती

China Army Recruitment: शी जिनिपिंग यांच्याकडून आधुनिक युद्धाची तयारी सुरु; चिनी सैन्यात काढली बंपर भरती

googlenewsNext

बिजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीएलएमध्ये बंपर भरती काढली आहे. सैन्याचे अत्याधुनिकीकरण करणे आणि भविष्यात युद्ध जिंकण्यासाठी तरुण सैन्याची भरती कण्यावर त्यांनी भर दिला आहे. यासाठी त्यांनी तातडीने तीन लाख सैनिक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसीय सैन्याच्या संमेलनामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. 

उच्च गुणवत्तेसह, इतर देशांशी लष्करी स्पर्धा जिंकणे आणि भविष्यातील युद्धांमध्ये पुढाकार घेणे ही चिनी सशस्त्र दलांच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे, असे ते म्हणाले. चिनी सैन्य 209 अब्ज डॉलर्सच्या वार्षिक लष्करी बजेटसह वेगाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे. संघटनात्मक सुधारणांसोबतच आधुनिक शस्त्रास्त्रेही सुसज्ज केली जात आहेत.

चीनची सरकारी वृत्तसंस्था 'शिन्हुआ'च्या वृत्तानुसार, शी म्हणाले की 2027 मध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या शताब्दी वर्षासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ठोस समर्थन प्रदान करण्यासाठी नवीन प्रतिभेची आवश्यकता आहे. "लढाई आणि जिंकण्याची क्षमता बळकट करणे हे लष्करी प्रतिभेचे प्रारंभिक बिंदू आणि अंतिम ध्येय असले पाहिजे'', असे जिनपिंग म्हणाले. 

चीनच्या सैनिकांचे आधुनिक युद्ध जिंकण्याची आणि त्यांची क्षमता सुधारण्याच्या वैज्ञानिक ज्ञान आणि तांत्रिक ज्ञान सुधारणेसाठी आवाहन केले. दरम्यान, हाँगकाँगच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टने सोमवारी वृत्त दिले की, तरुणांना एलएमध्ये सहभागी होण्यासाठी चीनच्या सैन्याने तीन लाख सैनिकांसाठी संसाधने वाढवली आहेत.

Web Title: Preparations for war begin from Xi Jinping; bumper recruitment declarerd in the Chinese army PLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.