विहीर खोदत असताना सापडलं असं अनमोल रत्न, किंमत आहे तब्बल ७५० कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 10:05 AM2021-07-28T10:05:30+5:302021-07-28T10:06:40+5:30

Sri Lanka Sapphire Cluster: खोदकाम करत असताना जमिनीखाली सोनं-नाणं, दागदागिने, मोहोरा सापडल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण श्रीलंकेमध्ये एका अधिकाऱ्याच्या घरातील परसदारामध्ये विहिरीचे खोदकाम करत असताना नीलम रत्नाचा अमूल्य दगड सापडला आहे.

The precious gem found while digging a well is worth Rs 750 crore in Sri Lanka | विहीर खोदत असताना सापडलं असं अनमोल रत्न, किंमत आहे तब्बल ७५० कोटी रुपये

विहीर खोदत असताना सापडलं असं अनमोल रत्न, किंमत आहे तब्बल ७५० कोटी रुपये

googlenewsNext

कोलंबो - खोदकाम करत असताना जमिनीखाली सोनं-नाणं, दागदागिने, मोहोरा सापडल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण श्रीलंकेमध्ये एका अधिकाऱ्याच्या घरातील परसदारामध्ये विहिरीचे खोदकाम करत असताना नीलम रत्नाचा अमूल्य दगड सापडला आहे. (Sri Lanka Sapphire Cluster) हे जगातील जगातील सर्वात मोठे नीलमचे रत्न असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे. अशा रत्नांचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याने सांगितले की, हा मौल्यवान दगड एका व्यक्तीला त्याच्या घरामागे विहीर खोदत असताना सापडला. तज्ज्ञांच्या मते या दगडाची किंमत ही आंरराष्ट्रीय बाजारात सुमारे १० कोटी डॉलर (७४० कोटी रुपये) रुपये एवढी आहे. (The precious gem found while digging a well is worth Rs 750 crore in Sri Lanka )

तज्ज्ञांनी या नीलमच्या दगडाला सेरेंडिपिटी सैफायर असे नाव दिले आहे. हे रत्न सुमारे ५१० किलो वजनाचे आणि २५ लाख कॅरेटचे आहे. या नीलमच्या रत्नाचे मालक असलेलेल्या डॉ. गामागे यांनी बीबीसीला सांगितले की, माझ्याकडे जी व्यक्ती, विहीर खोदत होती. त्याने खोदकामादरम्यान, जमिनीखाली काही अमूल्य रत्न दबलेले असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ते लोक या मोठ्या दगडाला जमिनीतून बाहेर काढण्यात यशस्वी झाले.

डॉ. गामागे यांनी सुरक्षेच्या कारणामुळे आपले पूर्ण नाव आणि पत्ता सांगितलेले नाही. डॉ. गामागे हेसुद्धा मौल्यवान रत्नांचे व्यापारी आहे. त्यांनी मिळालेल्या या रत्नाबाबत प्रशासनाला माहिती दिली आहे. मौल्यवान रत्न असलेला हा दगड स्वच्छ करण्यासाठी आणि त्यावरील मळ हटवण्यासाठी एक वर्षाची वेळ लागेल. त्यानंतरच याचे विश्लेषण करून त्याची नोंदणी होणार आहे.

डॉ. गामागे यांनी सांगितले की, सफाईदरम्यान या दगडामधून नीलमचे काही तुकडे तुटून पडले होते. त्यावेळी त्यांचे विश्लेषण केले असता हे अत्यंत उच्चश्रेणीमधील मौल्यवान दगड असल्याचे दिसून आले. हे रत्न असलेला दगड रतनपुरा शहरामध्ये आढळला होता. हे शहर श्रीलंकेमधील जेम सिटी म्हणून ओळखली जाते. येथे याआधीही अनेक मौल्यवान दगड सापडले होते.

श्रीलंका हा जगभरात नीलमचे दगड आणि अन्य मौल्यवान रत्नांचा निर्यातदार देश आहे. गेल्या वर्षीही श्रीलंकेने हिऱ्यांना पैलू पाडून आणि मौल्यवान रत्नांची निर्यात करून सुमारे ५० कोटी डॉलरची कमाई केली आहे. मात्र काही तज्ज्ञांच्या मते या क्लस्टरच्या आत बहुतांश नीलम हे उच्च दर्जाचे नसतील.  
 

Web Title: The precious gem found while digging a well is worth Rs 750 crore in Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.