तालिबानी सत्तासंघर्षात, दोन्ही सर्वोच्च नेते गायब; पंतप्रधान ठार, तर उपपंतप्रधान ओलीस?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 06:32 AM2021-09-22T06:32:06+5:302021-09-22T06:34:21+5:30

ब्रिटनच्या द स्पेक्टॅटर या नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार हैबतुल्ला अखुंदजादा आणि मुल्ला बरादर हे दोघे हिंसाचारात जखमी झाले आहेत. या संघर्षानंतर मुल्ला बरादरला ओलीस ठेवले असून, अखुंदजादा बहुधा मरण पावला आहे.

Power struggle In the Taliban, both top leaders disappeared | तालिबानी सत्तासंघर्षात, दोन्ही सर्वोच्च नेते गायब; पंतप्रधान ठार, तर उपपंतप्रधान ओलीस?

तालिबानी सत्तासंघर्षात, दोन्ही सर्वोच्च नेते गायब; पंतप्रधान ठार, तर उपपंतप्रधान ओलीस?

Next

काबूल : अफगाणिस्तानातील सर्व प्रांत ताब्यात आल्यानंतर तालिबानी नेत्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी त्यांच्यात सत्तेसाठी प्रचंड संघर्ष सुरू असून, उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर यांना ओलीस ठेवले आहे आणि पंतप्रधान व सर्वोच्च तालिबानी नेता हैबतुल्ला अखुंदजादा सध्या बेपत्ता आहे. त्याला ठार मारण्यात आल्याचे वृत्त आहे.

ब्रिटनच्या द स्पेक्टॅटर या नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार हैबतुल्ला अखुंदजादा आणि मुल्ला बरादर हे दोघे हिंसाचारात जखमी झाले आहेत. या संघर्षानंतर मुल्ला बरादरला ओलीस ठेवले असून, अखुंदजादा बहुधा मरण पावला आहे. मुल्ला बरादर याच्याकडून वाचून घेतलेले निवेदन एका वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आले. ते त्याच्याकडून जबरदस्तीने वाचून घेण्यात आल्याचा दावा होतो आहे. बरादरकडेच अफगाणची सूत्रे यावी, अशी अमेरिकेची इच्छा होती, असे कळते. 

महिला मंत्रालय बरखास्त
तालिबानने महिला मंत्रलयही बंद केले आहे. त्याऐवजी पुण्यप्रसार मंत्रलय स्थापन केले आहे. त्यामुळे संतप्त महिला मोर्चे काढत आहेत.

आयएसआयचा पाठिंबा
- या संघर्षात हक्कानी नेटवर्कचा विजय झाल्याचे वृत्त आहे. या नेटवर्कला पाकच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेचा पाठिंबा आहे. 
- मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना या तालिबानी नेत्यांत प्रचंड वाद सुरू झाले. खुर्च्या, टेबल आणि गरम चहाचे थर्मास एकमेकांच्या अंगावर फेकण्यात आले. हक्कानी नेटवर्कच्या खलील उल रहमानी हक्कानीने केलेल्या मारहाणीत मुल्ला बरादर खूपच जखमी झाला. 
आयपीएलवर बंदी, क्रिकेट बोर्ड बरखास्त 
सध्या आयपीएलच्या सामन्यांत अफगाणिस्तानातातील रशिद खान, मोहमद नबी व मुजीब उर रहमान सहभागी आहेत. पण हे सामने इस्लामविरोधी असल्याचे सांगून, ते टीव्हीवर दाखवण्यास तालिबानने बंदी घातली आहे. अफगाण क्रिकेट बोर्डही बरखास्त करण्यात आले आहे.
 

Web Title: Power struggle In the Taliban, both top leaders disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.