Pakistan Plane Crash: पाकिस्तानमध्ये विमान कोसळून ४५ जण ठार, तांत्रिक बिघाडानंतर पेटले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 05:46 AM2020-05-23T05:46:20+5:302020-05-23T09:36:44+5:30

लाहोरहून निघालेल्या या विमानात ९१ प्रवासी आणि चालक पथकाचे आठ सदस्य होते. विमानतळानजीकच्या जिन्ना हाऊसिंग सोसायटीत हे विमान कोसळले, असे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले.

A plane crash in Pakistan has killed at least 45 people and set it on fire after a technical glitch | Pakistan Plane Crash: पाकिस्तानमध्ये विमान कोसळून ४५ जण ठार, तांत्रिक बिघाडानंतर पेटले

Pakistan Plane Crash: पाकिस्तानमध्ये विमान कोसळून ४५ जण ठार, तांत्रिक बिघाडानंतर पेटले

Next

कराची : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान शुक्रवारी दुपारी आंतरराष्टÑीय विमानतळानजीकच्या दाट लोकवस्तीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४५ जण ठार झाले. कराचीतील विमानतळावर उतरण्याच्या बेतात असताना मल्ीारमधील मॉडेल कॉलनीनजीकच्या जिन्ना बागेत कोसळले.
लाहोरहून निघालेल्या या विमानात ९१ प्रवासी आणि चालक पथकाचे आठ सदस्य होते. विमानतळानजीकच्या जिन्ना हाऊसिंग सोसायटीत हे विमान कोसळले, असे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले.
शुक्रवारी दुपारी २.३७ वाजता (स्थानिक वेळेनुसार) विमानाचा विमानतळाशी संपर्क तुटला. तांत्रिक बिघाड काय होता, हे आताच सांगणे घाईचे ठरेल. विमानातील प्रवाशांत ३१ महिला आणि ९ मुले आणि विमानचालक पथकासह ९१ प्रवासी होते, असे पीआयएचे प्रवक्ते अब्दुल्ला हाफीज यांनी सांगितले.
लँडिंग गीअरमध्ये बिघाड असल्याचे वैमानिक कॅप्टन सज्जाद गूल यांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला कळविले होते. विमान उतरविण्यासाठी दोन विमानतळे उपलब्ध आहेत, असे त्यांना कळविण्यात आले. त्यानंतर विमान घिरट्या घेत कोसळले, असे पीआयएचे चेअरमन अर्शद मलिक यांनी सांगितले.
वृत्तवाहिन्यांनुसार विमान कोसळून १० घरे आणि काही वाहनांचे अतोनात नुकसान झाले. पाकमध्ये ७ डिसेंबर २०१६ नंतरची पहिली भीषण विमान दुर्घटना होय. या दुर्घटनेत ४८ जण ठार झाले होते.
पाकिस्तानचे अध्यक्ष अरीफ अल्वी, पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जन. कमर जावेद बाजवा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी दुर्घटनेची तातडीने चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. लष्करप्रमुख बाजवा यांनी लष्कराला मदत आणि बचाव कार्यासाठी नागरी प्रशासनाला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

तीन जण बचावले
- सिंध प्रांताचे आरोग्यमंत्री डॉ. अझरा पेशुहो यांनी सांगितले, ४५ मृतदेह इस्पितळात पाठविण्यात आले.
- या भीषण दुर्घटनेतून सुदैवाने तीन जण बचावले असून, त्यांना घटनास्थळावरील ढिगाऱ्यातून बाहेर काढून इस्पितळात हलविण्यात आले आहे.
- यापैकी एकाचे नाव जाफर मसूद असून, ते बँक आॅफ पंजाबचे अध्यक्ष आहेत. आपण ठीक असल्याचे त्यांनी आईला फोनवरून कळविले.
- दुसºया व्यक्तीचे नाव मोहम्मद झुबैर असल्याचे सांगण्यात येते.

इधी वेल्फेअर ट्रस्टचे फैजल इधी यांनी सांगितले की, विमान भरवस्तीत कोसळल्याने काही घरांचेही नुकसान झाले. येथील

25-30
रहिवासी भाजले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: A plane crash in Pakistan has killed at least 45 people and set it on fire after a technical glitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.