पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 06:35 IST2025-05-23T06:34:40+5:302025-05-23T06:35:19+5:30
शाहबाज शरीफ यांनी दावा केला की, पाकिस्तानने १९७१च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला आहे. पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची तयारी दाखविली होती. मात्र, भारताने त्यास नकार दिला.

पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
इस्लामाबाद : पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा अतिशय दुर्दैवी घटना होती. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती अतिशय धोकादायक वळण घेऊ शकली असती, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी गुरुवारी केली.
मुजफ्फराबाद येथे एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची तयारी दाखविली होती. मात्र, भारताने त्यास नकार दिला. भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला आणि आम्ही त्याला योग्य उत्तर दिले, असेही ते म्हणाले. शाहबाज शरीफ यांनी दावा केला की, पाकिस्तानने १९७१च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला आहे. दोन्ही देशांत नुकत्याच झालेल्या संघर्षात मरण पावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये आणि जखमींना १ ते २ लाख रुपयांची मदत दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.