Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:45 IST2025-05-15T16:44:14+5:302025-05-15T16:45:46+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष प्रचंड वाढला होता. पाकिस्तानकडून हवाई हल्ले वाढल्यानंतर भारतानेही पाकिस्तानातील हवाई दलाच्या तळांना आणि एअर डिफेन्स सिस्टिमवर प्रहार केला होता.

Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
Pakistan nuclear radiation news: भारताने पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्र असलेल्या किराना हिल्समध्येही हल्ले केल्याच्या चर्चा आणि वृत्त समोर आले. भारताने हे वृत्त फेटाळून लावले. पण, आण्विक ठिकाणांना धोका निर्माण झाल्यामुळेच ही शस्त्रसंधी झाल्याचे काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी म्हटले होते. या सगळ्या प्रकरणावर आता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीनेच भाष्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. त्यानंतर दोन्ही देशातील संघर्ष विकोपाला गेला होता. पाकिस्तानने तर थेट भारतीय सैन्य दलाच्या तळांना आणि नागरी वस्त्यांवरच हल्ले करण्याचा प्रयत्न केला. जे भारतीय लष्कराने हाणून पाडले. पाकिस्तानच्या या कृतीला भारतानेही जशास तसे उत्तर दिले. त्यात भारताने पाकिस्तानातील किराना हिल्स परिसरातील आण्विक सुविधा केंद्रालाही लक्ष्य केल्याचे वृत्त दिले गेले होते.
आण्विक सुविधा केंद्रातून किरणोत्सर्ग झाला का?
एएनआयने आयएईएने दिलेल्या माहितीनुसार हे वृत्त दिले आहे. "जी माहिती सध्या उपलब्ध आहे आहे. त्यानुसार पाकिस्तानातील आण्विक सुविधा केंद्रातून कोणत्याही प्रकारचा किरणोत्सर्ग झालेला नाही", अस आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने म्हटले आहे.
वाचा >>भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
एएनआयने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला ईमेलद्वार याबद्दल विचारले होते. त्यावर एजन्सीने किरणोत्सर्ग झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.
जगभरातील अणुऊर्जा केंद्र आणि आण्विक सुविधा केंद्रावर नजर ठेवण्याचे काम ही संस्था करते. भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल ए.के. भारती यांनी पत्रकार परिषदेत किराना हिल्स परिसरात हल्ले केल्याचे वृत्त फेटाळल्यानंतर आयएईएने हा खुलासा केला आहे.
ए.के. भारती काय म्हणालेले?
जेव्हा ए.के. भारती यांना किराणा हिल्स परिसरात पाकिस्तानचे आण्विक सुविधा केंद्र आहेत आणि त्याठिकाणाला भारतीय लष्कराने लक्ष्य केले आहे का? असा प्रश्न विचारला होता.
त्यावर एअर मार्शल भारती म्हणालेले की, "किराना हिल्समध्ये काही आण्विक फॅसिलिटी असल्याचे आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला त्याबद्दल माहिती नव्हते. तिथेही काही असो, पण आम्ही किराना हिल्स ठिकाणावर हल्ले केलेले नाहीत."