बाबो! क्वारंटाईन सेंटरमधून कोरोना पॉझिटिव्ह कपल पळालं अन् विमानात सापडलं; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 07:26 PM2021-11-29T19:26:52+5:302021-11-29T19:37:38+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लोकांना कोरोना नियमावलीचं पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

omicron infected couple fleeing country arrested from inside plane corona new variant updates | बाबो! क्वारंटाईन सेंटरमधून कोरोना पॉझिटिव्ह कपल पळालं अन् विमानात सापडलं; नेमकं काय घडलं? 

बाबो! क्वारंटाईन सेंटरमधून कोरोना पॉझिटिव्ह कपल पळालं अन् विमानात सापडलं; नेमकं काय घडलं? 

Next

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील एकूण रुग्णांची संख्या ही तब्बल 26 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. याच दरम्यान आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. ओमायक्रॉनमुळे प्रशासनाची चिंता वाढवली आहे. लोकांना कोरोना नियमावलीचं पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

क्वारंटाईन सेंटरमधून कोरोना पॉझिटिव्ह कपल पळाल्याची एक घटना समोर आली आहे. नेदरलँडमध्ये ही घटना घडली असून हे कपल देश सोडून जाण्याच्या तयारीत होतं. या कपलला शोधण्यासाठी पोलिसांनी अथक परिश्रम करावे लागले. पण त्यांना अटक करण्यात पोलिसांना आता य़श आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कपल क्वारंटाईन सेंटरमधून पळालं होतं. ते स्पेनमध्ये जाण्याच्या आधी एम्स्टर्डमच्या शिफोल विमान तळावर एका विमानात सापडलं. तिथेच त्यांना अटक करण्यात आली आहे. 

कोरोना नियमांचं उल्लंघन केलं म्हणून कारवाई

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, हे कपल गेल्य़ा आठवड्यात विमानाने एम्स्टर्डम पोहचलं होतं. क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्यात ते यशस्वी ठरले होते. सध्या त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं असून नियमांचं उल्लंघन केलं म्हणून कारवाई केली जात आहे. नेदरलँडमध्ये कोरोनामुळे जवळपास 20000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनेने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या ओमायक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटने खळबळ उडवली आहे. B.1.1.529 या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटला ओमायक्रॉन असं नाव देण्यात आलं आहे.

RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरिएंट ओळखता येणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरिएंटचं निदान करणं शक्य आहे. NGS-SA ने दिलेल्या माहितीनुसार, गौतेंग प्रांतामध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने पसरत आहे. हा संसर्ग अन्य प्रांतांमध्येही आधीच झाला असावा, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. वेगवेगळ्या क्लस्टर्समध्ये नवे रुग्ण आढळत असल्यामुळे सातत्याने एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचं म्युटेशन अत्यंत वेगळं असल्याचंही NGS-SA ने स्पष्ट केलं आहे. ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टा, अल्फा आदी यापूर्वीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त संसर्गजन्य आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 

Web Title: omicron infected couple fleeing country arrested from inside plane corona new variant updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.