नामिबियात अ‍ॅडॉल्फ हिटलरचा मोठा विजय; म्हणाला 'जगावर राज्य करण्याचे मनसुबे नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 09:13 AM2020-12-05T09:13:07+5:302020-12-05T09:14:24+5:30

Adolf Hitler News: क्रूरपणा आणि ज्यूंच्या कत्तलीसाठी कुप्रसिद्ध असलेला नेता अशी अ‍ॅडॉल्फ हिटलर याची जगभरात ओळख. हिटलरने जगाला विश्वयुद्धात ढकलले होते. मात्र, नामिबियाच्या हिटलरना लहानपणी हे नाव सामान्य वाटत होते.

OMG! Adolf Hitler's big win in Namibia; Said 'no intention to rule the world' | नामिबियात अ‍ॅडॉल्फ हिटलरचा मोठा विजय; म्हणाला 'जगावर राज्य करण्याचे मनसुबे नाहीत'

नामिबियात अ‍ॅडॉल्फ हिटलरचा मोठा विजय; म्हणाला 'जगावर राज्य करण्याचे मनसुबे नाहीत'

Next

दक्षिण ऑफ्रिकेमधील देश नामिबियामध्ये एका आमदारकीच्या निवडणुकीने जगाचे लक्ष वेधले आहे. येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर मोठ्या मताधिक्याने जिंकला आहे. मात्र, या उमेदवाराने आधीच स्पष्ट केले की, त्याचे जगावर राज्य करण्याचे मनसुबे मुळीच नाहीत. 


५४ वर्षांचे हे हिटलर हे नामिबियाच्या सत्ताधारी स्वापो पक्षाचे सदस्य आहेत. त्यांना ओम्पुंजा विधानसभा मतदारसंघतून जवळपास ८५ टक्के मते मिळाली आहेत. या मोठ्या विजयानंतर जर्मनीच्या एका वृत्तपत्राने त्यांची मुलाखत घेतली. 'बिल्ड'ने दिलेल्या वृत्तानुसार खऱ्य़ा अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या नाझी विचारधारेशी या नव्या आमदारांचा नावा व्यतिरिक्त काहीही संबंध नाही. 


हिटलरने जगाला विश्वयुद्धात ढकलले होते. मात्र, नामिबियाच्या हिटलरना लहानपणी हे नाव सामान्य वाटत होते. त्यांच्या वडिलांनी जर्मनीच्या अ‍ॅडॉल्फ हिटलरवरून हे नाव ठेवले होते. हिटलर यांच्या म्हणण्यानुसार त्यांना हे समजत नव्हते की अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या नावाचा अर्थ नेमका काय. 


जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मला समजले की या नावाची व्यक्ती खूप कुप्रसिद्ध आहे आणि तो जगावर राज्य करू इच्छित होता. मला या साऱ्या गोष्टींशी काहीच देणेघेणे नाही. माझे असे नाव असल्याचा हा अर्थ नाहीय की मी ओशाना जिथे ओम्पुंजा विधानसभा आहे, ती ताब्यात घेऊ इच्छितो, असे जिंकलेल्या हिटलरांनी सांगितले.


लोकांमध्ये त्यांना अ‍ॅडॉल्फ उनोना म्हणून ओळखले जाते. त्यांनी सांगितले की, माझे नाव बदलण्याचा कोणताही विचार नाहीय. कारण आता हे नाव माझ्या साऱ्य़ा अधिकृत कागदपत्रांमध्ये नोंद आहे. १८८४ ते १९१५ दरम्यान, नामिबिया जर्मनीचा हिस्सा होते. तेव्हा या देशाला जर्मन दक्षिण पश्चिमी आफ्रीका म्हटले जात होते. 

Web Title: OMG! Adolf Hitler's big win in Namibia; Said 'no intention to rule the world'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.