ओबामा दांम्पत्य गंमतीशीर आणि सुंदर - प्रियांका चोप्रा

By admin | Published: May 1, 2016 01:54 PM2016-05-01T13:54:04+5:302016-05-01T13:54:04+5:30

हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राने शनिवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांची भेट घेतली.

Obama's comic comedy and beautiful - Priyanka Chopra | ओबामा दांम्पत्य गंमतीशीर आणि सुंदर - प्रियांका चोप्रा

ओबामा दांम्पत्य गंमतीशीर आणि सुंदर - प्रियांका चोप्रा

Next

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. १ - बॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसवल्यानंतर आता हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राने शनिवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांची भेट घेतली.वॉशिंग्टन डिसीमध्ये व्हाईट हाऊसच्या करस्पॉंडंट डिनरच्या निमित्ताने तिला ओबामा दांम्पत्याला भेटता आले. 
 
हॉलिवूडमधल्या विशेष निमंत्रितांसाठी असलेल्या या डिनर प्रोग्रामला प्रियंकालाही बोलवण्यात आले होते. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर या भेटीची छायाचित्रे पोस्ट केली असून, बराक आणि मिशेल यांना भेटून आनंद झाल्याचे तिने म्हटले आहे. क्वांटिकोमधून अमेरिकेमध्ये लोकप्रिय झालेली प्रियांका सध्या अमेरिकेत बेवॉच या पहिल्या हॉलिवूडपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.  
 
 
पत्रकार, सेलिब्रेटी, राजकारणी आणि हॉलिवूड कलाकार असे अमेरिकेतल्या सोशल सर्कलमधल्या प्रसिद्ध व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. ओबामा यांचा व्हाईट हाऊसमधला अध्यक्ष या नात्याने शेवटचा करस्पॉडंट डिनर कार्यक्रम होता. 
 
काय आहे करस्पॉडंट डिनर कार्यक्रम 
करस्पॉडंट असोशिएशन ही व्हाईट हाऊसमधील बातम्यांचे वृत्ताकंन करणारे पत्रकार, निर्माते, कॅमेर ऑपरेटर यांची एक संघटना आहे. दरवर्षी ही संघटना व्हाईट हाऊसमध्ये डिनर कार्यक्रम आयोजित करते. पत्रकारीतेतल्या शिष्यवृत्तिचा पैसा उभा करण्यासाठी दरवर्षी ही संघटना हा भोजन समारंभाचा कार्यक्रम आयोजित करते. 

Web Title: Obama's comic comedy and beautiful - Priyanka Chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.