आता ग्रेटा थनबर्ग नासाच्या मंगळ मोहिमेवर भडकली, टीका करताना म्हणाली...

By बाळकृष्ण परब | Published: February 18, 2021 03:51 PM2021-02-18T15:51:18+5:302021-02-18T15:56:25+5:30

Greta Thunberg Criticize NASA's Mars mission : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे टूल किट शेअर केल्याने स्वीडनमधील पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग ही सध्या भारतामध्ये चर्चेत आहे.

Now Greta Thunberg has lashed out at NASA's Mars mission | आता ग्रेटा थनबर्ग नासाच्या मंगळ मोहिमेवर भडकली, टीका करताना म्हणाली...

आता ग्रेटा थनबर्ग नासाच्या मंगळ मोहिमेवर भडकली, टीका करताना म्हणाली...

Next
ठळक मुद्देग्रेटा हिने नासाच्या मंगळ मोहिमेवर जोरदार टीका केली आहेया मोहिमेला टीकेचे लक्ष्य करताना ग्रेटाने मंगळ ग्रहावरील पर्यटनाची एक जाहीरात शेअर केली आहेआपली पृथ्वी वातावरणातील बदलांचा सामना करत आहे. मात्र दुसरीकडे सरकारे आणि अंतराळ संस्था अन्य ग्रहांच्या प्रवासावर अब्जावधी रुपये खर्च करत आहेत

स्टॉकहोम - केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे  (Farmers Protest) टूल किट शेअर केल्याने स्वीडनमधील पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg ) ही सध्या भारतामध्ये चर्चेत आहे. (environment ) दरम्यान आता ग्रेटा हिने नासाच्या (NASA) मंगळ मोहिमेवर जोरदार टीका केली आहे. या मोहिमेला टीकेचे लक्ष्य करताना ग्रेटाने मंगळ (Mars) ग्रहावरील पर्यटनाची एक जाहीरात शेअर केली आहे. ती म्हणाली की, आपली पृथ्वी (Earth) वातावरणातील बदलांचा सामना करत आहे. मात्र दुसरीकडे सरकारे आणि अंतराळ संस्था अन्य ग्रहांच्या प्रवासावर अब्जावधी रुपये खर्च करत आहेत. (Greta Thunberg Criticize NASA's Mars mission)

ग्रेटाने मंगळ ग्राहवरील मोहिमांबाबत टीका करताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणते की याचा उद्देश केवळ एक टक्का लोकांसाठीच आहे. माझा सल्ला आहे की या लोकांनी पृथ्वी सोडून गेले पाहिजे आणि ९९ टक्के लोकांना इथे सोडले पाहिजे. जेणेकरू ते येथील वातावरणातील बदलांच्या समस्येवर तोडगा काढू शकतील. 

व्हिडीओमध्ये कटाक्ष टाकताना म्हटले आहे की, मंगळ ग्रह एक अशी जागा आहे ज्याच्या जमिनीला कुणी स्पर्शदेखील केलेला नाही. मात्र ती माणसांची वाट पाहत आहे. त्यामुळे वातावरणातील बदलांची चिंता न करता नव्या जीवनाची सुरुवात करता येईल. 
  
नासाचा Perseverance Rover मंगळ ग्रहावर उतरणार आहे. या रोव्हरवर नासाने दोन अब्ज ७० कोटी रुपये खर्च केले आहेत. नासाने मंगळावर आपली Perseverance मोहीम पाठवली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अशी माहिती गोळा केली जाणार आहे. तसेच तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात येणार आहे, ज्या माध्यमातून मंगळ ग्रहावर माणसांना पाठवण्याची पद्धत शोधली जाणार आहे. या रोव्हरमध्ये MOXIE नावाचे एक यंत्र लावण्यात आले आहे, त्या माध्यमातून मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

Web Title: Now Greta Thunberg has lashed out at NASA's Mars mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.