उत्तर कोरिया : मुलानं ५ मिनिटांसाठी पाहिली बॅन फिल्म; मिळाली १४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 02:22 PM2021-12-01T14:22:35+5:302021-12-01T14:22:58+5:30

North Korea : एका विद्यार्थ्याला बॅन चित्रपट पाहण्याच्या आरोपाखाली पाच मिनिटांत करण्यात आली अटक. त्यानंतर त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

north korean school boy 14 years jailed for watching five minutes banned South Korean movie | उत्तर कोरिया : मुलानं ५ मिनिटांसाठी पाहिली बॅन फिल्म; मिळाली १४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

उत्तर कोरिया : मुलानं ५ मिनिटांसाठी पाहिली बॅन फिल्म; मिळाली १४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

googlenewsNext

अनेकदा उत्तर कोरियाकिम जोंग उन (Kim Jong Un) यांच्यामुळे चर्चेचा विषय ठरत असतो. परंतु आता समोर अशी एक घटना आली की ज्यावरून तुमच्या मनात नक्कीच उत्तर कोरियामध्ये काय सुरू आहे असा प्रश्न येईल. उत्तर कोरियात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला बॅन केलेला चित्रपट पाहण्याच्या आरोपाखाली १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

एका शाळकरी विद्यार्थ्याला उत्तर कोरियामध्ये १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. Daily NK नं दिलेल्या वृत्तानुसार एका १४ वर्षीय विद्यार्थ्याला मिस्ट्री ड्रामा पाहण्याच्या आरोपाखाली ७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. या चित्रपटाचं नाव 'द अंकल' असं असून तो एक दक्षिण कोरियाई चित्रपट आहे. उत्तर कोरियाच्या सरकारनं त्या ठिकाणच्या लोकांवर दक्षिण कोरियाई चित्रपट पाहण्यावर निर्बंध घातले आहेत. या विद्यार्थ्याला हायस्टन सिटीतील शाळेतून अटक करण्यात आली.

५ मिनिटांत अटक
या विद्यार्थ्याला चित्रपट पाहण्याच्या पाच मिनिटांच्या आतच अटक करण्यात आली. यानंतर त्याला १४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली गेली. यापूर्वीही एका विद्यार्थ्यांला पॉर्न मुव्ही पाहताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनाही तुरुंगात टाकण्यात आलं होतं.

उत्तर कोरियात असोसिएशन सिस्टम
उत्तर कोरियामध्ये असोसिएशन सिस्टम आहे. या अंतर्गत कोणत्याही प्रकारे व्यक्तीनं सांस्कृतिक गुन्हा केल्यास त्याला कठोर शिक्षा ठोठावली जाते. याशिवाय त्यांच्याकडून २ लाखांचा दंडही आकारला जातो. जर गुन्हा करणारी व्यक्ती ५ ते १५ या वयोगटातील असेल तर त्याला सुधारणात्मक श्रमाची शिक्षा ठोठावली जाते.

Read in English

Web Title: north korean school boy 14 years jailed for watching five minutes banned South Korean movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.