'वडिलाने माझ्यावर 12 वर्ष रेप केला', 21 वर्षीय तरूणीने सांगितला वेदनादायी अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:03 PM2022-06-27T18:03:46+5:302022-06-27T18:04:56+5:30

Aicha Dounia : 21 वर्षीय तरूणीचं नाव आयशा डूनिया आहे. ती एक विद्यार्थीनी आहे. ती तिच्या पार्टनर आणि 6 महिन्यांच्या बाळासोबत डबलिनमध्ये राहते.

My father assaulted me for 12 years girl shares horror story | 'वडिलाने माझ्यावर 12 वर्ष रेप केला', 21 वर्षीय तरूणीने सांगितला वेदनादायी अनुभव

'वडिलाने माझ्यावर 12 वर्ष रेप केला', 21 वर्षीय तरूणीने सांगितला वेदनादायी अनुभव

Next

Aicha Dounia : एका तरूणीवर तिचा वडील 12 वर्ष रेप करत होता. तरूणीने तिच्या घडलेल्या या घटनेबाबत एका मुलाखतीत विस्ताराने सांगितलं. तरूणीने सांगितलं की, ती तिच्याबाबत सांगत आहे कारण इतर पीडित महिलांना हिंमत मिळेल. ती म्हणाली की, तिने जेव्हापासून तिची कहाणी सार्वजनिक केली, तेव्हापासून अनेक लोकांनी तिला संपर्क केला. तरूणी म्हणाली की, तिच्यासोबत जेव्हा हे होत होतं तेव्हा वाटत होतं की, ते मला मारून टाकतील.

21 वर्षीय तरूणीचं नाव आयशा डूनिया (Aicha Dounia)  आहे. ती एक विद्यार्थीनी आहे. ती तिच्या पार्टनर आणि 6 महिन्यांच्या बाळासोबत डबलिनमध्ये राहते. 'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, तरूणीच्या वडिलांना 2018 मध्ये 15 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. चौकशीतून समोर आलं होतं की, तरूणीच्या वडिलाने जानेवारी 2006 ते डिसेंबर 2017 पर्यंत तिच्यार रेप केला. 

आयशाने डेलीस्टारसोबत बोलताना सांगितलं की, तिच्यासोबत लैंगिक शोषण पहिल्यांदा 3 ते 4 वयाची असताना झालं होतं. आयशाच्या वडिलाला जेव्हा अटक झाली तेव्हा त्याने तिने त्याच्याशी कधी संपर्क ठेवला नाही.

आयशाने मुलाखतीत हेही सांगितलं की, कशाप्रकारे वडिलांनी अनेक वर्ष तिच्यावर अत्याचार केला. ती म्हणाली की, भलेही वडिलांना शिक्षा मिळाली, पण शिक्षा मिळण्याच्या दुसऱ्या दिवशी तिला वाटत होतं की, तिचं आयुष्य बर्बाद झालं. तिची इच्छा होती की, तिच्याजवळ असं शरीर असावं ज्याला तिच्या वडिलांनी स्पर्श केला नसेल.

आयशा म्हणाली की, वडिलांना शिक्षा मिळून बरीच वर्ष झाली. पण आजही तिला हेच वाटतं की, तिथे अजूनही पोहोचली नाही जिथे तिला असायला हवा.

Web Title: My father assaulted me for 12 years girl shares horror story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.