बाटलीतून बालकांना दूध भरविण्याची पद्धत प्रागैतिहासिक काळापासून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 03:48 AM2019-09-29T03:48:02+5:302019-09-29T03:48:17+5:30

बवेरियामध्ये (जर्मनी) दफनस्थानातील थडगी खोदण्यात आली, त्यावेळी बाळांना पोषक पेय देण्यासाठी वापरली जाणारी ही भांडी आढळून आली.

The method of breastfeeding from a bottle is from prehistoric times | बाटलीतून बालकांना दूध भरविण्याची पद्धत प्रागैतिहासिक काळापासून

बाटलीतून बालकांना दूध भरविण्याची पद्धत प्रागैतिहासिक काळापासून

Next

बवेरियामध्ये (जर्मनी) दफनस्थानातील थडगी खोदण्यात आली, त्यावेळी बाळांना पोषक पेय देण्यासाठी वापरली जाणारी ही भांडी आढळून आली. ख्रिस्तपूर्व ४५० ते १२०० दरम्यानची ही भांडी आहेत. बालकांना सहज हातात धरता येईल, अशी त्यांची रचना आहे. काही भांड्यांना काल्पनिक प्राण्यांचा आकार दिला आहे. मुलांना ती खेळणीच वाटावीत, असा त्यामागील हेतू असावा. थडग्यांचे उत्खनन केल्यानंतर त्यातील बालकांचे जे अवशेष आढळले, त्यावरून त्यांचे वय एक ते दोन वर्षे किंवा दोन ते सहा वर्षे असावे, असे दिसते.
मातीपासून बनवलेली ही छोटीशी खाद्य भांडी प्रथम युरोपमध्ये नवपाषाणयुगात इ.स.पू. ५,०००च्या सुमारास आढळली. त्यानंतरच्या कांस्य व लोह युगात अधिक प्रचलित झाली. तथापि, ही भांडी केवळ लहान मुलांसाठी तयार केली गेली आहेत किंवा कसे हे स्पष्ट झाले नाही. आजारी लोक किंवा वृद्धांना खायला देण्यासाठी त्यांचा वापर केला असण्याची शक्यता आहे.
ताज्या निष्कर्षांमध्ये असे दिसून आले आहे की, बालकांच्या दफनस्थानामध्ये सापडलेल्या तीन पात्रांमध्ये जनावरांचे दूध भरले होते. भांड्यांच्या तळाशी शिल्लक असलेल्या पदार्थांचे रासायनिक विश्लेषण केले असता, हे दूध गाय, शेळी किंवा मेंढरांपासून काढले असावे, असे आढळले.

बालकांना बाटलीने आहार देण्याची पद्धत आधुनिक नाही. काचेचा किंवा प्लॅस्टिकचा शोध लागण्यापूर्वी अगदी प्रागैतिहासिक संस्कृतीतील बाळांनाही छोट्या मातीच्या भांड्यांमध्ये जनावरांचे दूध दिले जात असे. एका संशोधनपर अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे.

Web Title: The method of breastfeeding from a bottle is from prehistoric times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.