इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:47 IST2025-12-02T18:47:08+5:302025-12-02T18:47:51+5:30
इम्रान खान हे रावळपिंडीच्या अदियाला जेलमध्ये कैद असून गेले कित्येक महिने त्यांना कुटुंबाला भेटू दिलेले नाही. यामुळे इम्रान खान यांच्या कुटुंबात आणि समर्थकांत मोठी खळबळ उडाली होती.

इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली...
पाकिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला होता. इम्रान खान हे रावळपिंडीच्या अदियाला जेलमध्ये कैद असून गेले कित्येक महिने त्यांना कुटुंबाला भेटू दिलेले नाही. यामुळे इम्रान खान यांच्या कुटुंबात आणि समर्थकांत मोठी खळबळ उडाली होती. लाखोंच्या संख्येने हे लोक अदियाला तुरुंगाला वेढा घालून बसले होते. अखेर आज इम्रान यांच्या बहिणीला तुरुंगात भेटीसाठी जाण्याची परवानगी देण्यात आली.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांची अखेर त्यांची बहीण डॉ. उजमा खान यांच्याशी भेट झाली आहे. ऑगस्ट २०२३ पासून अनेक प्रकरणांमध्ये अटकेत असलेले इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत आणि तुरुंगातील स्थितीबद्दल विविध चर्चा आसुरू होत्या. या भेटीनंतर, इम्रान खान यांची तुरुंगातील स्थिती कशी आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.
भेटीनंतर डॉ. उजमा खान यांनी माध्यमांना इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत माहिती दिली. इम्रान खान यांची तब्येत कशी आहे आणि तुरुंग प्रशासनाकडून त्यांना कोणत्या सुविधा मिळत आहेत, याबाबत डॉ. उजमा खान यांनी काय माहिती दिली, याकडे पाकिस्तानच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. इम्रान खान यांच्या भेटीगाठींवर अनेकदा निर्बंध लावण्यात आले असल्याने, या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
इम्रान खान ठीक आहेत आणि त्यांची प्रकृती चांगली आहे. इम्रान यांना एकांतवासात ठेवण्यात आले आहे आणि ते मानसिक त्रास दिला जात असल्याचे उजमा यांनी सांगितले.