इराणने ट्रम्प यांच्या विरोधात जारी केले 'अरेस्ट वॉरंट', इंटरपोलकडेही मागितली मदत, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 07:19 PM2020-06-29T19:19:25+5:302020-06-29T19:32:59+5:30

इराणने ट्रम्प आणि इतर आरोपींविरोधात इंटरपोलकडे उच्चस्तरीय रेड नोटिस जारी करण्याची मागणीही केली आहे. जेणेकरून या लोकांचे लोकेशन समजून त्यांना अटक करता येईल.

Iran issues arrest warrant against donald trump | इराणने ट्रम्प यांच्या विरोधात जारी केले 'अरेस्ट वॉरंट', इंटरपोलकडेही मागितली मदत, 'हे' आहे कारण

इराणने ट्रम्प यांच्या विरोधात जारी केले 'अरेस्ट वॉरंट', इंटरपोलकडेही मागितली मदत, 'हे' आहे कारण

Next
ठळक मुद्देट्रम्प आणि इतर 30हून अधिक लोकांनी मिळून 3 जानेवारीला एक हल्ला केला. यात सुलेमानीचा मृत्यू झाला, असा आरोप इराणने केला आहे. इराणने ट्रम्प आणि इतर आरोपींविरोधात इंटरपोलकडे उच्चस्तरीय रेड नोटिस जारी करण्याची मागणीही केली आहे.रेड नोटिस जारी झाल्यानंतर स्थानीक प्रशासन, ज्या देशाने नोटिस जारी करण्याची मागणी केली आहे, त्या देशासाठी संबंधित आरोपींना अटक करते.

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने आता आश्चर्यकारक वळण घेतले आहे. इराणने सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात थेट अरेस्ट वॉरंट जारी केले. एवढेच नाही, तर इराणने इंटरपोलकडेही ट्रम्प यांना पकडण्यासाठी मादत मागितली आहे. ट्रम्प यांनी अनेक लोकांच्या मदतीने बगदादमध्ये ड्रोन स्ट्राइक केले. यात इराणचा टॉप जनरल कासिम सुलेमानीचा मृत्यू झाला, असा इराणचा आरोप आहे. इराणने या सर्वांविरोधात वॉरंट काढले आहे.

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

'...तरीही शिक्षा देणारच'
तेहरानचे प्रॉसिक्यूटर अली अलकसिमेर सोमवारी म्हणाले, ट्रम्प आणि इतर 30हून अधिक लोकांनी मिळून 3 जानेवारीला एक हल्ला केला. यात सुलेमानीचा मृत्यू झाला, असा आरोप इराणने केला आहे. या लोकांवर इराणने हत्या आणि दहशतवादाचा आरोप लावला आहे. मात्र, अली यांनी ट्रम्प यांच्याशिवाय इतर लोकांची नावे जाहीर केली नाही. तसेच ट्रम्प यांच्या राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपला, तरीही त्यांना शिक्षा देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचेही अली यांनी म्हटले आहे.

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

इंटरपोलकडे रेड नोटिस जारी करण्याची मागणी -
अली म्हणाले, इराणने ट्रम्प आणि इतर आरोपींविरोधात इंटरपोलकडे उच्चस्तरीय रेड नोटिस जारी करण्याची मागणीही केली आहे. जेणेकरून या लोकांचे लोकेशन समजून त्यांना अटक करता येईल. सध्या, असे मानले जात आहे, की यासंदर्भात इंटरपोल कसल्याही प्रकारची भूमिका घेणार नाही. कारण 'राजकीय कार्यांत इंटरपोल सहभागी होऊ शकत नाही, असे त्याच्या निर्देशांत म्हटले आहे.

India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र

इंटरपोल काय करू शकते?
रेड नोटिस जारी झाल्यानंतर स्थानीक प्रशासन, ज्या देशाने नोटिस जारी करण्याची मागणी केली आहे, त्या देशासाठी संबंधित आरोपींना अटक करते. नोटिशीमुळे संशयित आरोपीला अटक करणे अथवा त्याचे प्रत्यर्पण करणे बंधनकार नसते. मात्र, त्याच्या प्रवासावर बंदी घालण्यात येते. अशी मागणी झाल्यानतंर, संबंधित माहिती सार्वजनिक कराची की नाही, यावर इंटरपोल कमिटीची चर्चा होते. यासंदर्भात माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक नसते. मात्र, अनेकदा वेबसाईटच्या माध्यमाने माहिती सार्वजनिकही केली जाते.

CoronaVirus News: चीनने तयार केली आणखी एक कोरोना व्हॅक्सीन; सुरक्षित आन् परिणामकारक असल्याचा दावा

Web Title: Iran issues arrest warrant against donald trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.