अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:03 IST2025-12-09T17:02:27+5:302025-12-09T17:03:43+5:30
इंडोनेशियातील जकार्तामध्ये मोठी आग लागली आहे. या घटनेत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू
इंडोनेशियातील जकार्तामध्ये मोठी आग लागली आहे. या घटनेत २० जणांचा मृत्यू झाला आहे. आगीत अडकलेल्यांसाठी बचावकार्य सुरू आहे. रॉयटर्सने अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा केली आहे. जकार्तामध्ये सात मजली कार्यालयीन इमारतीत भीषण आग लागली, ज्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी काम करत आहेत.
पोलीस चीफ सुसात्यो पुनोर्मो कोंड्रो यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दीडच्या सुमारास पहिल्या मजल्यावर लागलेली आग वेगाने संपूर्ण इमारतीत पसरली. टेरा ड्रोन इंडोनेशियाचे अनेक कर्मचारी इमारतीत उपस्थित होते. घटनेच्या वेळी ते जेवणासाठी बाहेर होते, तर इतर लोक आग लागल्यावर बाहेर पडले होते.
16.20 #InfoSonora#update
— Radio Sonora Jakarta (@SonoraFM92) December 9, 2025
Kebakaran di PT. Terra Drone Cempaka Putih Jakpus yg terbakar sejak siang tadi hingga saat ini masih dalam proses pemadaman. Banyak pegawai yg terjebak & mencoba menyelamatkan diri ke atas ruko.
Kabar terakhir 20 orang MD. 😭
Via @gatse8pic.twitter.com/94RapMll5D
पोलिसांनी सांगितलं की, पहिल्या मजल्यावर साठवलेल्या बॅटरीमुळे आग लागली, जी नंतर मोठ्या आगीत बदलली. प्रत्येक मजल्यावर कसून तपास केला जात आहे. आगीतून बाहेर पडलेल्यांचा शोध सुरू आहे. कोंड्रो यांनी सांगितलं की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
बचाव पथकं लोकांना बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. आग लागलेल्या इमारतीत खाणकाम ते शेतीपर्यंतच्या क्षेत्रात हवाई सर्वेक्षण ड्रोन पुरवणाऱ्या टेरा ड्रोन इंडोनेशियाची कार्यालयं होती. कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, हे जपानच्या टेरा ड्रोन कॉर्पोरेशनचं इंडोनेशियन युनिट आहे. कंपनीने सध्या कोणतंही विधान जारी केलेलं नाही.