क्रूर मुलाने आणि सुनेने केली वृद्ध आईला जबर मारहाण; मारहाणीत आईचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 10:17 AM2019-06-21T10:17:42+5:302019-06-21T10:18:02+5:30

ती माझ्या मुलीचा सांभाळ योग्यपणे करत नाही म्हणून ती आजारी पडते. त्यामुळे मी कामावरुन येईपर्यंत तु माझ्या मुलीचा सांभाळ कर

Indian Son & Daughter-In-Law Killed mother In Dubai | क्रूर मुलाने आणि सुनेने केली वृद्ध आईला जबर मारहाण; मारहाणीत आईचा मृत्यू  

क्रूर मुलाने आणि सुनेने केली वृद्ध आईला जबर मारहाण; मारहाणीत आईचा मृत्यू  

Next

दुबई - शहरातील भारतीय मुलाने आणि सुनेने आईला इतकी बेदम मारहाण केली की यामध्ये आईचा मृत्यू झाला. दुबईच्या न्यायालयात सध्या एक प्रकरण चर्चेत आहे ज्यामध्ये एका मुलाने आणि त्याच्या बायकोने मिळून आईला जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत आईच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात  रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

खलीज टाइम्सच्या रिपोर्टनुसार दुबईच्या एका न्यायालयात 29 वर्षीय भारतीय नागरिक आणि त्याच्या पत्नीविरोधात आईला मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या मारहाणीत आईच्या शरीराचा 10 टक्के भाग जळाल्याचं निर्दशनास आलं. तिला झालेल्या मारहाणीत आईचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीत असं आढळून आलं की, भारतीयाच्या पत्नीने अनेकदा वृद्ध आईला मारहाण केली आहे. 

ही दुर्दैवी घटना जुलै 2018 ते ऑक्टोबर 2018 मध्ये घडली आहे. फॉरेन्सिक डॉक्टरांच्या अहवालानुसार आईचं वजन फक्त 29 किलोग्राम होते. 31 ऑक्टोबर 2018 रोजी या वृद्ध आईचा मृत्यू झाला. मात्र अटक असलेल्या भारतीय दाम्पत्याने आईला मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. 

भारतीय दाम्पत्याच्या शेजारी राहणाऱ्या 54 वर्षीय भारतीय महिलेने खुलासा केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. ही महिला स्थानिक हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. आरोपी महिलेची आणि शेजारील महिलेची ओळख तिच्या छोट्या मुलीवरुन झाली होती. आरोपी महिलेने सांगितले होते की, तिची सासू भारतातून इथे राहायला आली आहे. ती माझ्या मुलीचा सांभाळ योग्यपणे करत नाही म्हणून ती आजारी पडते. त्यामुळे मी कामावरुन येईपर्यंत तु माझ्या मुलीचा सांभाळ कर असं आरोपी महिलेने शेजारील महिलेला सांगितले होते. 

प्रत्यक्षदर्शी महिलेने एका वृद्ध महिलेला बंगल्याच्या बालकनीमध्ये खाली पडलेल्या स्थितीत पाहिलं. ती जवळपास निवस्त्र होती तसेच तिच्या शरीराचा काही भाग जळालेला होता. प्रत्यक्षदर्शी महिलेने आरोपी दाम्पत्याचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर वॉचमॅनला सूचना केली. वृद्ध महिला गंभीर स्थितीत जमिनीवर पडून होती. तिला उपचाराची नितांत गरज होती. तेव्हा मी रुग्णवाहिका बोलविली असं प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. 

Web Title: Indian Son & Daughter-In-Law Killed mother In Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.