अभिमानास्पद! चार वर्षांची असताना एकटीने अमेरिका गाठली; आता सिरिशा बांदलाचे अवकाशात यशस्वी उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 12:45 PM2021-07-12T12:45:50+5:302021-07-12T12:50:16+5:30

अमेरिकी अंतराळ कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकच्या  (Virgin Galactic) अंतराळ मोहिमेत भारतीय वंशाच्या सिरिशा बांदला हीनं अवकाशात यशस्वी झेप घेतली आहे.

Indian Origin Sirisha Bandla Finally Went To Space Last Night On Virgin Galactic VSS Unity 22 Spacecraft | अभिमानास्पद! चार वर्षांची असताना एकटीने अमेरिका गाठली; आता सिरिशा बांदलाचे अवकाशात यशस्वी उड्डाण

अभिमानास्पद! चार वर्षांची असताना एकटीने अमेरिका गाठली; आता सिरिशा बांदलाचे अवकाशात यशस्वी उड्डाण

googlenewsNext

स्वप्नं ही आयुष्यभर स्वप्नं राहत नाहीत. ती खरी होतात. कारण ती सत्यात उतरवणं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे स्वप्नांना सत्यात उतरवून देशाचं नाव अभिमानानं उंचावणाऱ्या अशाच एका भारतीय कन्येचं स्वप्न पूर्ण झालं आहे. अमेरिकी अंतराळ कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकच्या  (Virgin Galactic) अंतराळ मोहिमेत भारतीय वंशाच्या सिरिशा बांदला हीनं अवकाशात यशस्वी झेप घेतली आहे. व्हीएसएस युनिटी २२ स्पेसक्राफ्टचं न्यू मेक्सिको येथून यशस्वी उड्डाण झालं आहे. मिशन यशस्वी झाल्याबाबतचा एक व्हिडिओ देखील व्हर्जिन गॅलेक्टिकच्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आला आहे. 

कल्पना चावलानंतर आता आणखी एक भारतीय महिला घेणार अंतराळात झेप; सिरिशा बांदला उड्डाणासाठी सज्ज!

अवकाशात स्थिरावल्यानंतर व्हर्जिन गॅलेक्टिकचे रिचर्ड ब्रेनसन (Richard Branson) यांनी एक व्हिडिओ शूट केला आहे. यात त्यांनी स्पेसक्राफ्टच्या यशस्वी उड्डाणाची माहिती दिली आहे. ब्रेनसन आणि सहकारी स्पेसक्राफ्टमध्ये आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. सोशल मीडियात सिरिशा बांदलाच्या यशाचं कौतुक केलं जात आहे. 

अंतराळवीर कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळात झेप घेणारी सिरिशा दुसरी भारतीय वंशाची महिला अंतराळवीर ठरली आहे. सिरिशा अंतराळात संशोधन विभागाची जबाबदारी सांभाळणार आहे. अंतराळ मोहिमेवर जाणाऱ्या सहा जणांच्या पथकात दोन महिलांचा समावेश आहे. सिरिशासोबत आणखी एक बेश मोसिस या महिला शास्त्रज्ञाचा समावेश आहे. 

आंध्रप्रदेशात जन्म
सिरिशा बांदला यांचा जन्म भारतात आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात एका गावात झाला होता. तर टेक्सासच्या ह्यूस्टनं येथे त्यांचं शालेय शिक्षण झालं आहे. त्यांचे आजोबा बांदला रगहिया एक कृषी वैज्ञानिक आहेत आणि त्यांनी आपल्या नातीच्या कामगिरीचंही तोंडभरुन कौतुक केलं आहे.

Web Title: Indian Origin Sirisha Bandla Finally Went To Space Last Night On Virgin Galactic VSS Unity 22 Spacecraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.