“अयशस्वी देशाकडून धडे घेण्याची गरज नाही”; काश्मीरवरून भारताने पाकला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 11:14 AM2021-09-16T11:14:49+5:302021-09-16T11:15:23+5:30

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला (OIC) भारताने चांगलेच सुनावले आहे.

india slams pakistan oic for raising kashmir issue at unhrc | “अयशस्वी देशाकडून धडे घेण्याची गरज नाही”; काश्मीरवरून भारताने पाकला फटकारले

“अयशस्वी देशाकडून धडे घेण्याची गरज नाही”; काश्मीरवरून भारताने पाकला फटकारले

googlenewsNext

नवी दिल्ली: काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानच्या कायम कुरापती सुरू असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तान काश्मीर मुद्द्यावरून भारताला घेरण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. यातच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला (OIC) भारताने फटकारले आहे. भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा अधिकार ओआयसीला नाही. तसेच एका अयशस्वी आणि दहशतवादाचे केंद्र असलेल्या देशाकडून धडे घेण्याची भारताला गरज नाही, या शब्दांत भारताने पाकिस्तानला फटकारले आहे. (india slams pakistan oic for raising kashmir issue at unhrc)

जिनेव्हा येथील भारताच्या स्थायी अभियानाचे प्रथम सचिव पवन बधे यांनी भारताचा दृष्टिकोन परिषदेत मांडला. यूएनएचआरसीच्या बैठकीत भारताने पाकिस्तानवर जोरदार घणाघात केला. संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या दहशतवाद्यांना खुलेआम समर्थन देणारा, प्रशिक्षण, वित्तपुरवठा आणि शस्त्रे पुरवणारा देश म्हणून  पाकिस्तानची जागतिक पातळीवर ओळख आहे, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. 

ही विचारधारेची लढाई, तडजोड नाही; संघ, भाजपवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल

पाकिस्तान मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे

काश्मीरबाबत पाकिस्तान आणि आयओसीने सतत वक्तव्ये केल्यानंतर भारताने थेट प्रत्युत्तर दिले. या परिषदेला माहिती आहे की, पाकिस्तान मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे आणि भारताच्या भूभागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. हिंदू, शीख आणि ख्रिश्चन आणि अहमदियासारख्या समुदायाबद्दल पाकिस्तानची वृत्ती जगापासून लपलेली नाही, असे भारताने म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानला उघडपणे दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे, त्यांना प्रशिक्षण, पैशांची मदत करत आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध खोटा प्रचार करण्यासाठी या परिषदेचा वापर करतो. भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे आणि जगातील दहशतवादाचे केंद्रबिंदू असलेल्या पाकिस्तानसारख्या अपयशी देशांकडून भारताला कोणत्याही धड्याची गरज नाही, या शब्दांत भारताने पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. 
 

Web Title: india slams pakistan oic for raising kashmir issue at unhrc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.