India China Faceoff: ...म्हणून चीनच्या मृत सैनिकांचे कुटुंबीय शी जिनपिंगवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 03:50 AM2020-06-27T03:50:32+5:302020-06-27T07:03:39+5:30

आता सांत्वन करून या नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न चीन सरकारने चालविला आहे.

India China Faceoff: The families of the dead Chinese soldiers became angry | India China Faceoff: ...म्हणून चीनच्या मृत सैनिकांचे कुटुंबीय शी जिनपिंगवर भडकले

India China Faceoff: ...म्हणून चीनच्या मृत सैनिकांचे कुटुंबीय शी जिनपिंगवर भडकले

Next

बीजिंग : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात चीनचे जे ४०पेक्षा अधिक सैनिक ठार झाले, त्यांच्या पार्थिवाचा उचित आदर न राखल्याने आणि त्यांच्या मृत्यूची वेळेत माहिती न दिल्याने सैनिकांचे कुटुंबीय संतप्त झाले आहेत. आता सांत्वन करून या नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न चीन सरकारने चालविला आहे.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक हु शिजिन यांनी सांगितले की, वीरमरण आलेल्या सैनिकांविषयी लष्करासहित सर्वांच्याच मनात अतिशय आदर आहे. त्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली आहे. त्याची माहिती योग्य वेळी चिनी जनतेला दिली जाईल. असे सांगून या वृत्तपत्राने चीन सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. गलवान खोºयातील संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र चीनने त्यांच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे जे सैनिक ठार झाले, त्यांचा उचित आदर राखला नाही, त्यांची नावेही जाहीर केली नाहीत असा आरोप या सैनिकांच्या नातेवाईकांनी केला होता. त्याची व्हिडीओफितही समाजमाध्यमांवर झळकली होती. त्यानंतर दोन दिवसांनी याच विषयावर ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने संपादकीय लिहिले आहे.
भारतीय जवानांबरोबर गलवान खोºयात झालेल्या संघर्षात चीनचे २० पेक्षा कमी सैनिक ठार झाले आहेत असा उल्लेख या संपादकीयात करण्यात आला आहे. मात्र मृतांचा नेमका आकडा किती याविषयी चीनच्या सरकारने मौन बाळगले आहे. 
>मृतांचा आकडा गुलदस्त्यातच
ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक हु शिजिन यांनी संपादकीयात म्हटले आहे की, दोन्ही देशांतील जनमत बिथरू नये यासाठी चीनने गलवान संघर्षातील मृत सैनिकांचा आकडा जाहीर केलेला नाही. या संघर्षात भारतीय जवानांनी चीनच्या ४०पेक्षा जास्त सैनिकांना ठार केले आहेत तसेच भारताने १६ सैनिकांचे मृतदेह चीनच्या हवाली केले अशा बातम्या पसरल्या होत्या. पण या निव्वळ अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहनही या संपादकीयात करण्यात आले आहे.

Web Title: India China Faceoff: The families of the dead Chinese soldiers became angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन