india china faceoff china statement after the talks with indian nsa ajit doval on ladakh galwan vally  | India china faceoff : वाद वाढेल असं काही करायचं नाही!; डोवालांसोबतच्या चर्चेनंतर 'असं' आलं चीनचं निवेदन - म्हणाला...

India china faceoff : वाद वाढेल असं काही करायचं नाही!; डोवालांसोबतच्या चर्चेनंतर 'असं' आलं चीनचं निवेदन - म्हणाला...

ठळक मुद्देभारत आणि चिनी सैनिकांमध्ये गेल्या 15 जूनला पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात जबरदस्त हिंसक झटापट झाली होती.सैन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसएंगेजमेन्ट प्रक्रियेअंतर्गत चिनी सैन्य 1.5 किमी मागे हटले आहे.एकत्रितपणे संबंधांचे संरक्षण करू - चीन

 
पेइचिंग - भारत आणि चिनी सैनिकांमध्ये गेल्या 15 जूनला पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात जबरदस्त हिंसक झटापट झाली होती. यानंतर आता, म्हणजेच जवळपास 3 आठवड्यांनंतर चीन नरमला आहे. आता चीनने सीमेवर शांततेसंदर्भात बोलायला सुरुवात केली आहे. तसेच भारताच्या सोबतीने सीमावर्ती भागात विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासंदर्भात पुरुच्चार केला आहे. 

सैन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसएंगेजमेन्ट प्रक्रियेअंतर्गत चिनी सैन्य 1.5 किमी मागे हटले आहे. यातच आता, चीनचे परराष्ट्रमंत्री वान्ग यी यांनी एक सविस्तर निवेदन जारी केले आहे. या निवेदना, दोन्ही पक्षांकडून, असे कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलले जाणार नाही, ज्यामुळे वाद वाढेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

'70 वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले' -
भारताचे विशेष प्रतिनिधि आणि राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अ‍जीत डोवाल यांनी वान्ग यांच्याशी रविवारी सीमा मुद्द्यावर चर्चा केली होती. यानंतर चीनने सविस्तर निवेद जारी करत म्हटले आहे, की चीन आणि भारत यांच्यातील हे  डिप्लोमॅटिक संबंधाचे 70वे वर्ष आहे. चीन आणि भारतीय संबंधांनी अनेक चढ-उतार पाहिले. तसेच आज जो विकास झाला आहे, तो साध्य करणे सोपे नाही.

'चीन सार्वभौमत्वाचे संरक्षण करत राहील' -
निवेदनात म्हणण्यात आले आहे, की भारत आणि चीनदरम्यान गलवान खोऱ्यात जे झाले ते स्पष्ट आहे. चीन आपले क्षेत्रीय सार्वभौमत्व, सीमावर्ती भाग आणि शांततेचे प्रभावीपणे संरक्षण करत राहील. तसेच विकास आणि नूतनीकरण चीन आणि भारतासाची प्राथमिकता आहे. त्यामुळे एकमेकांना धोका निर्माण होणार नाही, या दृष्टाने दोघांनीही रणनीतीक निर्णयांचे पालन करायला हवे. तसेच विकासाच्या संधीही उपलब्ध करून द्याव्यात, या मुद्द्यांवरही वान्ग यांनी जोर दिला.

'एकत्रितपणे संबंधांचे संरक्षण करू' -
सध्य स्थितीनंतर, दोन्ही देशांतील सहकार्य आणि सर्वसाधारण एक्सचेंज सुरू ठेवला जावा. असे कुठलेही पाऊल उचलू नये. ज्यामुळे वाद वाढेल. तसेच, एकत्रितपणे दोघांच्याही संबंधांचे सरक्षण केले जावे. याशिवाय, दोन्ही पक्षांच्या वतीने झालेल्या करारावर सहमती दर्शवण्यात आली आणि सीमेवरील स्थिती व्यवस्थीत राहील यासंदर्भात दोघांकडूनही प्रयत्न केले जातील हे निश्चित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या -

चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी

चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: india china faceoff china statement after the talks with indian nsa ajit doval on ladakh galwan vally 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.