पाकिस्तानी लष्कराच्या पाठी लपणारे इम्रान खान भ्याड नेते, अपयश झाकण्याचा प्रयत्न - मरियम नवाज

पाकिस्तानी लष्कराच्या पाठी लपणारे इम्रान खान भ्याड नेते, अपयश झाकण्याचा प्रयत्न - मरियम नवाज

कराची :पाकिस्तानची जनता जेव्हा आपल्या प्रश्नांची उत्तरे मागते त्यावेळी पंतप्रधान इम्रान खान लष्कराच्या पाठीमागे लपतात. इम्रान खान भ्याड असून, आपले अपयश झाकण्यासाठी ते लष्कराचा वापर करीत आहेत, असा आरोप त्या देशाचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी केला आहे.

पाकिस्तानातील ११ विरोधी पक्षांनी आघाडी स्थापन केली असून, त्यामध्ये नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) या पक्षाचाही समावेश आहे. या आघाडीतर्फे जीना मैदानावर झालेल्या सभेत मरियम नवाज बोलत होत्या. दरम्यान, सोमवारी सकाळी पोलिसांनी मरियम नवाज यांचे पती सफदर अवान यांना ते ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत, तेथे अटक केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Imran Khan a cowardly leader hiding behind Pakistan Army, tries to cover up failure says Maryam Nawaz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.