ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 03:37 AM2019-09-26T03:37:37+5:302019-09-26T03:52:31+5:30

विदेशी शक्तीमार्फत डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी जो बायडन यांना बदनाम करण्यासाठी ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या शपथेचे उल्लंघन केल्याचा ड्रेमोक्रॅटिक्स खासदारांनी केला आहे.

The impeachment process against Trump begins | ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू

ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू

Next

वॉशिंग्टन : विदेशी शक्तीमार्फत डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी जो बायडन यांना बदनाम करण्यासाठी ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या शपथेचे उल्लंघन केल्याचा ड्रेमोक्रॅटिक्स खासदारांनी केला आहे. या आरोपावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांच्याविरुद्धच्या महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधी सभेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी केली.

ट्रम्प यांच्या कार्यकाळातील कृती अध्यक्षपदासाठी घेतलेल्या शपथेप्रती प्रतारणा करणारी आहे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन करणारी आणि निवडणूक एकात्मतेप्रती दगाबाजी करणारी असल्याने प्रतिनिधी सभागृह (हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज्स) ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची अधिकृत प्रक्रिया सुरू करण्याची मी घोषणा करीत आहे, असे पेलोसी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

किचकट अशा महाभियोगाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून ट्रम्प यांना पदावरून हटविण्याची शक्यता फारच कमी असली तरी या त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्याच्या घोषणेने हाईट हाऊस आणि संसद ताब्यात घेण्यासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी १४ महिने बाकी असतानाच अमेरिकन राजकारणात एक जोखमीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
 

Web Title: The impeachment process against Trump begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.