इराणमधील 52 ठिकाणे निशाण्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 08:58 AM2020-01-05T08:58:29+5:302020-01-05T09:07:27+5:30

अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेच्या स्थळांवर हल्ला करणाऱ्यांना वेचून वेचून ठार केले जाईल.

If Iran strikes American assets, US will hit 52 Iranian sites - Donald Trump | इराणमधील 52 ठिकाणे निशाण्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा 

इराणमधील 52 ठिकाणे निशाण्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा 

Next

तेरहान - इराणमधील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक असलेले सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने ड्रोण हल्ला करून हत्या केल्याने इराण आणि अमेरिकेतील तणाव कमालीचा वाढला आहे. दरम्यान, सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घोषणा इराणकडून करण्यात आली असून, शनिवारी रात्री इराण समर्थित मिलिशियाने इराकमधील अमेरिकन दुतावासासह अन्य काही अमेरिकन ठिकाण्यांवर रॉकेट आणि मोर्टारने हल्ले केले. तसेच शनिवारी सकाळी ईराणने जामकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवून युद्धाचे संकेत दिले आहेत. दरम्यान, इराणकडून झालेल्या रॉकेट हल्लानंतर इराणमधील महत्त्वाची 52 ठिकाणे निशाण्यावर असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

अमेरिकी ठिकाण्यांवरील रॉकेट हल्ल्यांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ''अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेच्या स्थळांवर हल्ला करणाऱ्यांना वेचून वेचून ठार केले जाईल. जर इराणने आमच्या ठिकाणांवर हल्ला केला तर आम्ही त्यांच्या 52 ठिकाणांवर संहारक हल्ला करून ती नष्ट करू. ही 52 ठिकाणे इराण आणि त्याच्या संस्कृतीसाठी फार महत्त्वाची आहेत,''असा सज्जड इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे.  



दुसरीकडे शनिवारी सकाळी ईराणने जामकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवून युद्धाचे संकेत दिले आहेत. कोम येथील जामकरन मशिदीवर सर्वसामान्यपणे धार्मिक झेंडे फडकवले जातात. त्यामुळे धार्मिक झेंडे काढून लाल झेंडा फडकवण्याचा अर्थ युद्धाच्या घोषणेच्या रूपात घेतला जात आहे. कारण लाल झेंड्याचा अर्थ दु:ख व्यक्त करणे नसते. त्यामुळे आता इराण आपल्या देशवासियांना अशा आपातकालिन स्थितीस तयार राहण्यास सांगत आहे. जी त्यांनी याआधी कधीही पाहिलेली नाही. अगदी इराण आणि इराकमधील युद्धावेळी सुद्धा लाल झेंडा फडकवण्यात आला नव्हता. इराणमधील कुठल्याही मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.  

शनिवारी रात्री इराकमधल्या अमेरिकी दूतावासावर रॉकेटचा मोठा हल्ला करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी बगदादमध्ये अमेरिकी दूतावासात रॉकेट डागण्यात आले. या हल्ल्यामुळे इराकमध्ये खळबळ उडाली. स्थानिक सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, इराकची राजधानी बगदादमधल्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकी दूतावासात एका रॉकेटचा स्फोट झाला. बगदादमधल्या ग्रीन झोनमधल्या अमेरिकी दूतावासाच्या आत कत्युषा रॉकेटनं हल्ला करण्यात आला. परंतु या हल्ल्यात किती नुकसान झालं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या हल्ल्यानंतर बगदादच्या आकाशात अमेरिकेची विमानं घिरट्या घालताना दिसत होती. इराक स्थित बलाद एअरफोर्सवरही दोन रॉकेट डागण्यात आली आहेत. अमेरिकी सैनिकांची तिकडेसुद्धा छावणी होती. 

Web Title: If Iran strikes American assets, US will hit 52 Iranian sites - Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.