हाफिज सईदला साडेपाच वर्षांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 06:23 AM2020-02-13T06:23:02+5:302020-02-13T06:23:20+5:30

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार; दोन खटल्यांत दोषी

Hafiz Saeed sentenced to five and a half years prison | हाफिज सईदला साडेपाच वर्षांचा तुरुंगवास

हाफिज सईदला साडेपाच वर्षांचा तुरुंगवास

Next

इस्लामाबाद : ‘जमात-उद-दवा’ संघटनेचा सर्वेसर्वा हाफिज सईदला दहशतवादाशी संबंधित दोन खटल्यांत लाहोरच्या विशेष कोर्टाने बुधवारी प्रत्येकी साडेपाच वर्षांचा कारावास व १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. हाफिज मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याचा सूत्रधार म्हणून भारतातही ‘वॉन्टेड’ आहे.


सईदचा सहकारी व अल-अन्फाल ट्रस्टचा सचिव मलिक झफर इक्बाल यालाही त्याच दोन खटल्यांत तेवढीच शिक्षा सुनावली. धर्मादाय संस्थांच्या नावे उभा केलेला पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याच्या गुन्हा निकालाच्या वेळी न्यायालयात हजर दहशतवादविरोधी पोलिसांच्या लाहोर व गुजरानवाला शाखांनी हे खटले दाखल केले होते. अभियोग पक्षाच्या २३ साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून दोन्ही आरोपींना शिक्षा ठोठावल्या. शिक्षा सुनावली, तेव्हा हाफिज सईद निकालाच्या वेळेत न्यायालयात हजर होता. त्यांच्यावर होता. अमेरिका, भारत व अन्य देशांचा दबाव व आर्थिक निर्बंधांच्या शक्यतेने पाकला ही कारवाई कराली लागली. त्यांच्यावर नोंदवण्यात आलेल्या एकूण २३ गुन्ह्यांपैकी चार खटले उभे राहिले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Hafiz Saeed sentenced to five and a half years prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.