Gunmen Kill 11 People In Bar In Brazil | ब्राझिलमधील बेलेम शहरात गोळीबार, 11 जणांचा मृत्यू
ब्राझिलमधील बेलेम शहरात गोळीबार, 11 जणांचा मृत्यू

रियो डि जनेरो  : उत्तर ब्राझिलमध्ये रविवारी शस्त्रधारी हल्लेखोरांनी अंधाधुंध गोळीबार केला. यामध्ये जवळपास अकरा लोकांना मृत्यू झाल्याची घटना घडली. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राझिलमधील बेलेम शहरात असलेल्या एका बारमध्ये हल्लेखोरांनी अंधाधुंध गोळीबार केला. यात 11 जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहे. जखमींना जवळ्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. तर, येथील जी 1 या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, एका हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, दुचाकी आणि 3 कारमधून आलेल्या सात हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याचेही या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. 

दरम्यान, या हल्ल्यामागील कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 


Web Title: Gunmen Kill 11 People In Bar In Brazil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.