शांततेत आंदोलन करणे वादातीत मानवाधिकार; दिशा रविच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट

By देवेश फडके | Published: February 20, 2021 10:42 AM2021-02-20T10:42:36+5:302021-02-20T10:45:35+5:30

ट्विटर टूलकिट प्रकरणी दिशा रविला अटक करण्यात आल्यानंतर आंततराष्ट्रीय पातळीवरील पर्यावरण ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) प्रथमच आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी दिशा रविला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

greta thunberg reacts to disha ravi arrest | शांततेत आंदोलन करणे वादातीत मानवाधिकार; दिशा रविच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट

शांततेत आंदोलन करणे वादातीत मानवाधिकार; दिशा रविच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट

Next
ठळक मुद्देदिशा रवि अटक प्रकरणी ग्रेटा थनबर्गची पहिली प्रतिक्रियाशांततेत आंदोलन करणे वादातीत मानवाधिकार - ग्रेटाट्विटच्या माध्यमातून दिशा रविचे केले समर्थन

वॉशिंग्टन :ट्विटर टूलकिट प्रकरणी दिशा रविला (Disha Ravi) अटक करण्यात आल्यानंतर आंततराष्ट्रीय पातळीवरील पर्यावरण ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) प्रथमच आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी दिशा रविला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. (greta thunberg reacts to disha ravi arrest)

ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या टूलकिटमध्ये बदल करून ते पुढे पाठवल्याचा आरोप दिशा रविवर ठेवण्यात आला आहे. दिशा रविला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, ग्रेटा थनबर्गने दिशा रविच्या समर्थनार्थ लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करून ट्विट केले आहे. दिशा रविच्या अटकेनंतर ग्रेटा थनबर्गची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. 

काय म्हणतेय ग्रेटा थनबर्ग?

अभिव्यक्तीचे स्वातंत्र आणि एकत्रितपणे शांततेत आंदोलन करणे हा वादातीत मानवाधिकार आहे. हे लोकशाहीची मूलभूत अंग असायलाच हवे, असे ग्रेटा थनबर्गने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय हे ट्विट करताना तिने #StandWithDishaRavi या हॅशटॅगचा वापरही केला आहे. एक प्रकारे ही टीका असून, भारतातील लोकशाहीवर उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह आहे, असे सांगितले जात आहे. 

दिशा रवीविरोधी एफआयआरसंबंधी काही वृत्त खळबळजनक- दिल्ली हायकोर्ट

दरम्यान, बंगळुरूतील पर्यावरण कार्यकर्ता असलेल्या दिशा रविला दिल्ली पोलिसांनी तिच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर तिला दिल्लीतील पातियाळा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सुरुवातीला न्यायालयाने दिशा रविला पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर तिची तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच दिशा रविविरुद्ध करण्यात येत असलेल्या तपासाबाबत काही माध्यमांनी दिलेले वृत्त सनसनाटी निर्माण करणारे आणि पूर्वग्रहदूषित असल्याचे सूचित होते, असे निरीक्षण न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीवेळी नोंदवले.

Web Title: greta thunberg reacts to disha ravi arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.