ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा कहर; भारत सरकार म्हणतं 'नो टेन्शन'!

By मोरेश्वर येरम | Published: December 21, 2020 02:59 PM2020-12-21T14:59:31+5:302020-12-21T15:06:07+5:30

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेमुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

govt alert no need to panic Vardhan on new coronavirus strain in UK | ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा कहर; भारत सरकार म्हणतं 'नो टेन्शन'!

ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा कहर; भारत सरकार म्हणतं 'नो टेन्शन'!

Next
ठळक मुद्देघाबरण्याचं कारण नाही, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची ग्वाहीब्रिटनमधील कोरोनाच्या परिस्थितीवर भारत सरकारचं पूर्ण लक्षब्रिटनमध्ये पुन्हा करण्यात आला कडक लॉकडाउन

नवी दिल्ली
कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराने (स्ट्रेन) ब्रिटनमध्ये खळबळ माजवलेली असताना आता भारतातही याबाबतची अधिक काळजी घेण्याच्या माणगीने जोर धरला आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेमुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती लक्षात घेता युरोपमधून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. 

दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात अलर्ट जारी करण्यात आला असून घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 
युरोपमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराने खळबळ उडाली. नवा व्हायरस आधीच्या व्हायरसपेक्षा ७० टक्क्यांनी अधिक वेगाने पसरत असल्याचं लक्षात आलं आहे. युरोपमधील या परिस्थितीमुळे संपूर्ण जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. जगभरातून १५ हून अधिक देशांनी विमान प्रवासावर निर्बंध घातले आहेत. पण भारताने मात्र याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. 

केंद्र सरकार म्हणतं घाबरण्याचं कारण नाही
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन नव्या व्हायरसला घाबरुन जाण्याचं काही कारण नसल्याचं म्हटलं आहे. "केंद्र सरकार पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी गेल्या वर्षभरात सरकारने आवश्यक सर्व निर्णय घेतल्याचं तुम्ही पाहिलं आहे. काय करावं? आणि काय करु नये? याची पूर्ण कल्पना सरकारला आहे. माझ्या मते देशातील जनतेने घाबरण्याचं कोणतही कारण नाही", असं हर्षवर्धन म्हणाले. 

कोरोनाच्या नव्या प्रकाराबद्दल चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज बैठकीचं आयोजन केलं आहे. आरोग्य सेवेचे महासंचालक या बैठकीचं नेतृत्व करणार आहेत. तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रतिनिधी बैठकीला उपस्थित असणार आहेत. 

ब्रिटनमध्ये हाहा:कार
कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया, चिली, बग्लेरिया आणि दक्षिण अरबकडून ब्रिटनच्या प्रवासावर बंदीची घोषणा केली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे दक्षिण इंग्लंडमधील बाजार ख्रिसमस आधीच बंद करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये चतुर्थ श्रेणीच्या कडक लॉकडाउनची घोषणा बोरिस जॉन्सन यांनी केली आहे. 
 

Web Title: govt alert no need to panic Vardhan on new coronavirus strain in UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.