Corona Vaccine: भारताला परवडणाऱ्या दरात 25 कोटी कोरोना लसी देणार; गरिबांच्या 'गावी'ने ठेवली एकच अट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 02:23 PM2021-05-08T14:23:09+5:302021-05-08T14:26:44+5:30

India Will get 25 crore corona Vaccine: कोरोना लस जेव्हा तयार होत होत्या, तेव्हा श्रीमंत देशांनी त्यांचे बुकिंग करण्यास सुरुवात केली होती. मात्र, गरीब देश पुरेसा पैसा नसल्याने तसे करू शकत नव्हते. यामुळे गरीब आणि मध्यम परिस्थिती असलेल्या देशांना देखील परवडणाऱ्या दरात लस मिळावी यासाठी गावी य़ा आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली होती.

GAVI to supply 25 crore corona vaccines to India at affordable rates | Corona Vaccine: भारताला परवडणाऱ्या दरात 25 कोटी कोरोना लसी देणार; गरिबांच्या 'गावी'ने ठेवली एकच अट

Corona Vaccine: भारताला परवडणाऱ्या दरात 25 कोटी कोरोना लसी देणार; गरिबांच्या 'गावी'ने ठेवली एकच अट

Next

पहिल्या लाटेनंतर जगभरासाठी कोरोना लसी (Corona Vaccine) उपलब्ध करणाऱ्या भारतामध्ये दुसऱ्या लाटेने (Corona Virus Second Wave) थैमान घातले आहे. नाही नाही म्हणत अमेरिका, ब्रिटन, रशिया, इस्त्रायलसारखे देश भारताच्या मदतीला धावून आले आहेत. अशातच गरीब देशांना कोरोना लस उपलब्ध करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गावी (Global Alliance for Vaccines and Immunisation) या जागतिक संघटनेने भारताला 25 कोटी कोरोना लसी परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली आहे. (India To Get 19 to 25 Crore Fully Subsidised Doses Of Corona Vaccine from Gavi.)

CoronaVirus: पहिल्या लाटेवेळचा अंदाज चुकला! देशात का पसरली कोरोनाची दुसरी लाट? संशोधकांनी शोधले उत्तर


कोरोना लस जेव्हा तयार होत होत्या, तेव्हा श्रीमंत देशांनी त्यांचे बुकिंग करण्यास सुरुवात केली होती. मात्र, गरीब देश पुरेसा पैसा नसल्याने तसे करू शकत नव्हते. यामुळे गरीब आणि मध्यम परिस्थिती असलेल्या देशांना देखील परवडणाऱ्या दरात लस मिळावी यासाठी गावी (GAVI ) य़ा आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली होती. आता ही संघटना भारताला मोठ्या प्रमाणावर लस पुरविणार आहे. ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन (गावी) असे या संघटनेचे नाव आहे.


गावी ही संघटना भारताला तब्बल 25 कोटी कोरोना लसीचे डोस देणार आहे. यासाठी भारताला लस साठविण्याचे, वाहतुकीची यंत्रणा आणि कोल्ड चेन बनविण्यासाठी गावीला 220 कोटी रुपये द्यावे लागणार आहे. याबाबतचा निर्णय गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्येच कोव्हॅक्स बोर्डाकडून घेण्यात आला होता. मात्र, तेव्हा सर्व कंपन्यांच्या लसींच्या चाचण्या सुरु होत्या. 

CoronaVirus Live Updates : पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये 'फोन पे चर्चा'; CoWIN अ‍ॅपबाबत मुख्यमंत्र्यांनी लिहिलं पत्र, म्हणाले...


सध्याचे भारतावरील संकट पाहता गावी मदतीसाठी तयार आहे. कोव्हॅक्स बोर्डाच्या निर्णयानुसार भारताला एकूण उपलब्ध लसीच्या साठ्याच्या 20 टक्के लस दिली जाणार आहे. डोसची ही संख्या 19 ते 25 कोटींच्या आसपास असणार आहे. भारत जगातील महत्वाचा आणि प्रमुख लस निर्माता आहे. परंतू सध्या हाच देश कोरोनाच्या मोठ्या लाटेत सापडला आहे. यामुळे मागणीनुसार पुरवठा करणे त्यांना कठीण जात आहे, असे गावीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. 

CoronaVirus in India: देशात हाहाकार! कोरोना बळींचा आकडा 4200 समीप; चार लाखांहून अधिक रुग्ण


गावी तिसऱ्या तिमाहीमध्ये भारताच्या सीरमकडून लस मिळेल या अपेक्षेत होती. मात्र, सीरमला सध्या भारतालाच पुरेशी लस पुरविणे जमत नाहीय. यामुळे जगासाठी लस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे कोव्हॅक्स अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांकडून लसींचे दान मागण्याची शक्यता आहे. अमेरिकेने गावीला लस पुरविण्याबाबत शब्द दिला आहे. 

Web Title: GAVI to supply 25 crore corona vaccines to India at affordable rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.