अमेरिका, ब्रिटनसह 4 देशांचा बिजिंग विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार; चीन म्हणाला, किंमत मोजावी लागेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 03:51 PM2021-12-09T15:51:26+5:302021-12-09T15:55:01+5:30

चीनने मंगळवारी इशारा दिला होता की, मानवाधिकाराच्या  चिंतेवरून बिजिंग हिवाळी ऑलिम्पिकवरील राजनैतिक बहिष्कारासाठी अमेरिकेला किंमत मोजावी लागेल. अमेरिकेसह चार देशांच्या या निर्णयाने खेळाडूंना पुढील वर्षी फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या खेळांमध्ये सहभागी होण्यापासून रोखले आहे.

four olympic diplomatic boycott nations will pay the price says china  | अमेरिका, ब्रिटनसह 4 देशांचा बिजिंग विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार; चीन म्हणाला, किंमत मोजावी लागेल!

अमेरिका, ब्रिटनसह 4 देशांचा बिजिंग विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार; चीन म्हणाला, किंमत मोजावी लागेल!

Next

बिजिंग हिवाळी ऑलिम्पिकवर (Olympic) अमेरिकेसह चार देशांनी राजनैतिक बहिष्कार टाकल्याने चीन खवळला आहे. या चारही देशांना बहिष्काराची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही चीनने गुरुवारी दिला. चीनमधील उइगर मुस्लिमांसोबत होत असलेल्या गैरवर्तनाबद्दल चिंता व्यक्त करत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि कॅनडाने बिजिंग हिवाळी ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

चीनने मंगळवारी इशारा दिला होता की, मानवाधिकाराच्या  चिंतेवरून बिजिंग हिवाळी ऑलिम्पिकवरील राजनैतिक बहिष्कारासाठी अमेरिकेला किंमत मोजावी लागेल. अमेरिकेसह चार देशांच्या या निर्णयाने खेळाडूंना पुढील वर्षी फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या खेळांमध्ये सहभागी होण्यापासून रोखले आहे.

खरे तर, चीनमध्ये उइगर मुस्लिमांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत अमेरिकेने ही भूमिका घेतली आहे. याआधीही अमेरिकेसह अनेक देशांनी उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारावरून नाराजी व्यक्त केली आहे. चीनमध्ये बिजिंग हिवाळी ऑलिम्पिक 4 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

Web Title: four olympic diplomatic boycott nations will pay the price says china 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.